शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2016 2:44 AM

कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली

कळंबोली : दातावरील उपचारांसाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त करत संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.पुष्पा अमरिषचंद पांडे (५५) बिहार, वाराणसी येथील रहिवासी असून भाच्याच्या लग्नाकरिता वाराणसी येथून कळंबोलीत आल्या होत्या. कळंबोली येथे शांती विहार सेक्टर १६ येथे आपल्या मुलीकडे पुष्पा या वीस दिवसांपासून राहत होत्या. सोमवारपासून पुष्पा यांच्या दातात दुखू लागल्याने मुलीसोबत मंगळवारी साडे दहाच्या सुमारास उपचाराकरिता एमजीएम रु ग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टर तपासणीअंती दात काढावा लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी पुष्पा पांडे व त्यांच्या मुलीला देण्यात आला. पुष्पा पांडे व त्यांच्या मुलीच्या संमतीनुसार दात काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान पुष्पा यांचा मृत्यू झाला. डॉक्टरने आपल्याकडून झालेल्या हालगर्जीपणाची सारवासारव केली. दात काढतेवेळी रुग्ण दगावल्याची माहिती पुष्पा यांच्या नातेवाइकांना देण्यात आली. सर्व घटनेस डॉक्टर जबाबदार असल्याचे व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमची आई दगावल्याची भावना पुष्पा पांडे यांच्या मुलीने व्यक्त केला आहे.रुग्णाची तब्येत ठीक नसल्याने उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती एमजीएम रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली. तर या घटनेची माहिती मिळताच कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुष्पा पांडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतरच कळेल. यासाठीचा तपास चालू असून तपासाअंतीच योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोपेरे यांनी सांगितले. (वार्ताहर)