लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे : सांसद ग्रामयोजनेतून विकास करताना सरकारने एक नया पैसाही तरतूद केलेली नसताना केवळ खासदार म्हणून मिळालेल्या प्रतिष्ठेच्या जोरावर गावचा विकास करण्याचे काम वंदना चव्हाण यांनी लीलया पेलले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून महिलांना आरक्षण देताना अनेक प्रस्थापितांनी व्यक्त केलेली भीती महिलांनी त्यांच्या कर्तृत्वाने खोटी ठरविली आहे. असे प्रतिपादन माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी सुदुंबरे (ता. मावळ) येथे केले.सांसद आदर्श ग्रामयोजनेंतर्गत पुण्याच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी दत्तक घेतलेल्या सुदुंबरे गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रतिभाताई पवार, खासदार श्रीरंग बारणे, खासदार चव्हाण, माजी खासदार विदुरा नवले, माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दिगंबर भेगडे अॅड. राम कांडगे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, सरपंच संगीता भांगे, जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, ज्येष्ठ नेते बाजीराव गाडे, आदी उपस्थित होते.महिला अस्मिता भवन, वडगाव लायन्स क्लब बगीचा, वैयक्तिक ८० शौचालये, प्राथमिक शाळा इमारत, रस्ते, शुद्ध पाणीपुरवठा प्रकल्प, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल गाव संकल्पना आदी विकासकामांचा संदर्भ खासदार चव्हाण यांनी दिला. ग्रामस्थातर्फे माजी सरपंच माणिक गाडे यांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार रणजित देसाई, गणेश ढोरे, विठ्ठल शिंदे आदी उपस्थित होते.
महिलांनी कर्तृत्वातून आरक्षण सार्थ ठरविले
By admin | Published: June 02, 2017 2:14 AM