शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
5
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
6
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
7
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
8
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
9
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
10
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
11
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
12
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
15
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
16
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
17
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
18
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
19
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
20
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  

एस.टी.तील महिला कर्मचारी बालसंगोपन रजेपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 8:17 AM

एस.टी.च्या महिला कर्मचारी बालसंगोपन रजेपासून वंचित असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : एस.टी.च्या महिला कर्मचारी बालसंगोपन रजेपासून वंचित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सण असो, यात्रा असो वा आपत्कालीन परिस्थिती, एस.टी. कर्मचाऱ्यांना नोकरीवर हजर राहत सेवा बजवावी लागते. त्यामुळे ना रजा, ना रजांचा मोबदला, कुटुंबासाठी वेळ देता येत नसल्याने एस.टी. महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी  घेतला होता.

मुलांचे शिक्षण व त्यांच्याकडे लक्ष देता यावे या  दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला होता. तरीही त्याचे पालन नीट होत नसल्याने  अनेक महिला कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. गरजेच्या वेळी सुट्या दिल्या जात नाहीत. अनेकांच्या रजा बुडल्याचीही उदाहरणे आहेत.  महिलांना १८० दिवसांची रजा कुठल्याही प्रकारचे बंधन न घालता मिळावी, अशी मागणी महिला कर्मचाऱ्यांनी एसटी प्रशासनाकडे केली आहे. 

पुरुष कर्मचाऱ्यांना रजा नाहीया रजेचा लाभ महिला कर्मचारी, तसेच पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी, तसेच ज्या कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरूणाला खिळली आहे. अशा पुरुष कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याचे परिपत्रक निघाले होते. परंतु, प्रत्यक्षात या रजांचा लाभ अनेकांना मिळत नाही. रजांच्या बदल्यात एस.टी. महामंडळाकडून  मोबदला देण्यात येत नाहीत.

महामंडळातील महिला कर्मचारी, तसेच अधिकारी यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी सहा महिन्यांची बालसंगोपन रजा मंजूर करण्याचा निर्णय तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी २०१८ मध्ये जाहीर केला होता. काही महिन्यांनी त्यामध्ये सुधारणा करीत महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतिकाळात सहाऐवजी नऊ महिन्यांची रजा देण्याचा निर्णयही घेण्यात आला. पण गेल्या दोन वर्षांपासून या बालसंगोपन रजेचा लाभ मिळालेला नाही.श्रीरंग बरगे,सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस