शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

बाळाचा ताबा मिळविण्यासाठी ‘हिरकणी’ने दिला लढा, दूध पाजण्यास असमर्थ असल्याने पतीने घरातून हाकलले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 10:50 AM

सुमारे दीड महिन्याच्या न्यायालयीन लढ्यानंतर बाळाचा ताबा मिळविण्यात मातृत्व यशस्वी ठरले.

पुणे : ‘बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई’ यातून आईचे बाळाबद्दलचे ममत्व आणि कृतार्थ भाव व्यक्त होतात. आपल्या बाळापासून आईला वेगळं केलं जातं, तेव्हा त्याला मिळवण्यासाठी ती वाघाच्या जबड्यातही हात घालायला मागे-पुढे पाहात नाही.

अशाच एका आईला आपल्या तान्हुल्यासाठी न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ आली. ती बाळाला दूध पाजण्यास असमर्थ असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे तिला घरातून हाकलून देत निष्ठुर पतीने १५ दिवसांच्या बाळाला आईपासून दूर केले. सुमारे दीड महिन्याच्या न्यायालयीन लढ्यानंतर बाळाचा ताबा मिळविण्यात मातृत्व यशस्वी ठरले.

सप्टेंबर २०१९ मध्ये राकेश आणि रिना (बदलेली नावे) दोघांचा विवाह झाला. दोघांच्या संसारवेलीवर ३ एप्रिल रोजी गोंडस फूल जन्माला आले. ती आनंदी होती. काही दिवसातच तिला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. ती बाळाला दूध पाजण्यास असमर्थ असल्याचे समजल्यानंतर पतीने तिला १८ एप्रिल रोजी घरातून हाकलून दिले. त्यानंतर तिने छोट्या बाळाचा ताबा मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला.

तिने डॉक्टरांनी दिलेले सर्व सल्ले ऐकले. तरीही तिला घरातून हाकलून देण्यात आले. ज्यामुळे निष्पाप बाळ आईच्या प्रेमाला मुकले. आईवर बाळाचा नैसर्गिक हक्क आहे. ते ६० दिवसांच्या आतील बाळ असल्यामुळे त्याच्या ताब्याची मागणी करण्यात आली.

वडिलांचे वडीलपणही जपण्याचे आदेशपतीच्या वतीने पत्नीला मानसिक उपचाराची गरज आहे, ती मुलाची काळजी घेण्यास असमर्थ असल्याची बाजू मांडण्यात आली. मात्र, न्यायालयाने मुलाचा ताबा आईकडे देण्याचा आदेश दिला. त्याबरोबरच मुलाची नीट काळजी घेण्याबाबतचे शपथपत्र लिहून घेतले. याबरोबरच वडिलांचेही वडीलपण जपत जरी मुलाचा ताबा आईकडे असला, तरीही वडिलांना बाळाला भेटण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. पिंपरी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वानखेडे यांनी हा आदेश दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय