ऑनलाइन लोकमतशहापूर, दि. 13 - ग्रामपंचायत निवडणूक काळात झालेल्या वादानंतर शहापूर कोर्टात जामीन देण्यासाठी किन्हवली पोलीस ठाण्यात हजर झालेल्या आदिवासी महिला येथीलच काही महिला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीप्रकरणी शहापूर भाजपच्या वतीने गुरुवारी राञी 9 वाजेपासून ठिय्या धरण्यात आला आहे. सदर महिला पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून केली जात असून गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ठिय्या सोडणार नसल्याचे भाजपचे शहापूर तालुकाध्यक्ष सुभाष हरड यांनी सांगितले आहे.
शहापुर तालुक्यातील कानडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक 25 जुलै रोजी पार पडली यावेळी भाजप व सेनेत शीतयुध्द रंगल्याने वाद उफाळून आला होता. याचे पर्यावसान हाणामारीत झाले होते याप्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात 54 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान गुरुवारी 15 महिलांना शहापुर कोर्टात जामीन दयावयाचा असल्याने कानडी येथील गुन्ह्यात असलेल्या 15 महिला किन्हवली पोलीस ठाण्यात हजर झाल्या असताना किन्हवली पोलीस ठाण्यातील काही महिला पोलीस कर्मचा-यांकडून आदिवासी महिलांना चप्पला व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भाजपकडुन गुरुवारी 9 वाजेपासून ठिय्या धरण्यात आला असुन महिला पोलीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडुन केली जात आहे या ठिय्या आंदोलनास भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष शितल तोंडलीकर, जिल्हा सरचीटणीस जयश्री चव्हाण, सुवर्णा ठाकरे, सुरेखा इरनक, जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा दिनकर, महिला तालुकाध्यक्षा मीनाक्षी मडके, अशोक इरनक, दिपक विशे, मुकुंद शिर्के, नरसु गावंडा आदींसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या धरला आहे