पुणे : पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या संकल्पनेमधून महिला दिनाच्या औचित्याने ग्रामीण भागातील महिलांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रतिसाद अॅप सुरू केले आहे. अॅन्ड्रॉईड फोन वापरणाऱ्यांना हे अॅप डाऊनलोड करून घेता येणार आहे. अॅपमधील सुविधेनुसार अडचणीच्या काळात पोलिसांची मदत केवळ एका क्लिकवर मिळू शकणार असल्याची माहिती अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी दिली. मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून हे अॅप सिलेक्ट करावे लागणार आहे. त्यानंतर डाऊनलोड करावे लागणार आहे. हे अॅप इनस्टॉल केल्यानंतर स्क्रीनवर लाल रंगामध्ये सोशल एमरजेन्सी असा आयकॉन दिसेल. कोणतीही महिला अथवा नागरिक जर संकटात सापडले तर त्यांना तात्काळ पोलिसांची मदत पोचवली जाणार आहे. एमरजेंसीचे बटन दाबल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्ष तसेच स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिका-यांसह कर्मचा-यांच्या मोबाईलवर अलर्ट जाणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून अधिकाधिक लोकाभिमुख होण्याचा प्रयत्न सुरु असून महिला व नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी हे अॅप डाऊनलोड करून वापर करावा़- डॉ. जय जाधव, ग्रामीण पोलीस अधीक्षक
एका क्लिकवर महिलांना मिळणार सुरक्षा!
By admin | Published: March 13, 2016 1:36 AM