शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By admin | Published: December 16, 2014 1:07 AM

स्थानिक वडाळी येथील बंद असलेल्या देशी दारु विक्रीच्या दुकानाबाबत नव्याने मतदान घेण्याला कडाडून विरोध नोंदविण्यासाठी सोमवारी महिला आंदोलकांनी येथील राज्य उत्पादक शुल्क

अमरावतीतील दारु दुकानाचा प्रश्न : मतदान घेण्यास विरोधअमरावती : स्थानिक वडाळी येथील बंद असलेल्या देशी दारु विक्रीच्या दुकानाबाबत नव्याने मतदान घेण्याला कडाडून विरोध नोंदविण्यासाठी सोमवारी महिला आंदोलकांनी येथील राज्य उत्पादक शुल्क आणि जिल्हाधिकारी कार्यालय गाठून कैफियत मांडली. देशी दारुचे दुकान सुरु करण्यासाठी पुन्हा मतदान घेतले तर कायदा हातात घेऊ, असा इशारा देखील महिलांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा, सुव्यवस्थेबाबत न्यायालयात वस्तुस्थिती कळविली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर महिलांचा आक्रोश कमी झाला, हे विशेष.अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा प्रयत्नआंदोलक महिलांनी येथील एक्साईजचे कार्यालय गाठताच निरीक्षक एस.जे. ठाकूर यांना काळे फासण्याचा केला. मात्र ही बाब ठाकूर यांच्या लक्षात येताच त्यांनी वरिष्ठांशी बोलायचे आहे, असे सांगून कसेबसे दालनातून बाहेर पडले. नंतर त्यांच्या मदतीला धावून आलेले उपनिरीक्षक एस.एस. रंधे यांना महिलांनी कक्षातच रोखून धरले.मतदान नकोच- जिल्हाधिकारीसोमवारी जिल्हाधिकारी कक्षात झालेल्या चर्चेदरम्यान वडाळी येथील देशी दारु विक्रीच्या दुकानाबाबत मलाही मतदान प्रक्रिया नको आहे, अशी प्राजंळ कबुली जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आंदोलक महिलांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना दिली. येत्या दोन दिवसांत उच्च न्यायालयाला पत्र पाठवून मतदान नव्हे तर हे दुकान अन्य ठिकाणी हलविण्याचे कळविले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.