शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

महिला कैद्यांचा होतो अनन्वित छळ

By admin | Published: July 14, 2017 6:10 AM

भायखळा कारागृहात छोट्या-छोट्या गोष्टींवरून महिला कैद्यांचा अनन्वित छळ केला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भायखळा कारागृहात छोट्या-छोट्या गोष्टींवरून महिला कैद्यांचा अनन्वित छळ केला जातो. त्यांच्यावर अमानवी अत्याचार केले जात असल्याची तक्रार महिला कैद्यांनी संसदेच्या महिला सशक्तीकरण समितीकडे केल्याचे पथकातील एका महिला खासदाराने ‘लोकमत’ला सांगितले. मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाचे पडसाद देशभर उमटत असून, संसदेच्या महिला सशक्तीकरण समितीनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुरुवारी भायखळा कारागृहाची पाहणी केली. आसामच्या खासदार बिजोया चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील सुमारे ३० महिला खासदारांच्या पथकाने भायखळा कारागृहात महिला कैद्यांशी संवाद साधत त्यांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा, सुरक्षितता आदींची माहिती घेतली. या पथकात महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, भाजपाच्या रक्षा खडसे आदींचा समावेश होता. या खासदारांनी महिला कैद्यांसह कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशीही चर्चा केली. कारागृहात महिला कैद्यांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा, महिला कैद्यांच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला. यावेळी कैदी महिलांनी आपली कैफियत समितीपुढे मांडली. मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणामुळे कारागृहाच्या भिंतीआड होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले. महिला कैद्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न महिला खासदारांनी जाणून घेतले. यासंदर्भातील गोपनीय अहवाल तयार केला असून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाणार आहे, असे खा. रक्षा खडसे यांनी सांगितले. >चौकशी समिती नेमलीमंजुळा शेट्ये या महिला कैद्याचा २४ जून २०१७ रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असून हत्येप्रकरणी जेलर मनीषा पोखरकर, महिला पोलीस शिपाई बिंदू नाईकवडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली. महिला आयोगानेही चौकशी समिती नेमली आहे.