शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

‘लोकमत’च्या पुढाकाराने महिला हक्कांची सनद

By admin | Published: November 02, 2016 1:38 AM

महिलांच्या हक्कांबाबत समाजमन तयार होणे तर आवश्यकच आहे;

पुणे : महिलांच्या हक्कांबाबत समाजमन तयार होणे तर आवश्यकच आहे; पण त्याबरोबरच शासकीय पातळीवरही महिला अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज आहे. यासाठी महिला संघटनांना एका व्यासपीठावर आणून ‘लोकमत’च्या पुढाकाराने महिला हक्कांची सनद केली जाणार आहे. महिलांच्या हक्कांची ही सनद शासनाला सादर केली जाणार आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कोपर्डी, दिल्लीतील निर्भयासारखी घटना घडल्यावर, याबाबत चर्चा होते; मात्र कृतिशील पाऊल उचलले जात नाही. यामुळेच समाजात प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिला संघटनांना एका व्यासपीठावर आणण्याचा उपक्रम ‘लोकमत’च्या वतीने सुरू करण्यात आला आहे. यासाठीची पहिली बैठक नुकतीच झाली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, आमदार मेधा कुलकर्णी, शांता रानडे, उज्ज्वला मसदेकर, प्रा. प्रतिमा परदेशी, शैलजा चौधरी, अ‍ॅड. शैलजा मोळक, रत्ना यशवंते, सुनंदा साळवे आदी महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले. स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य रुजवितानाच माणूस म्हणून एकमेकांचा आदर करणे आवश्यक आहे, ही भावना लहान मुलांमध्ये रुजविण्याच्या दृष्टीने शालेय अभ्यासक्रमात लंैगिक शिक्षणाचा तातडीने समावेश व्हावा; तसेच गाणी, गोष्टींमधून प्रबोधन व्हावे, पीडित मुलगी आणि कुटुंबाला ताबडतोब मनोधैर्य योजनेचा आधार मिळावा, पोलीस, वकील, डॉक्टर अशा सर्वच स्तरांवर अद्ययावत ज्ञान मिळावे, त्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत, अशा भावना स्त्री चळवळीतील कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या सदिच्छा भेटीत व्यक्त केल्या. स्त्रियांच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या लहान-मोठ्या संघटनांची माहिती संकलित करून, ती सामान्यांपर्यंत पोहोचावी, अशी अपेक्षाही या वेळी व्यक्त करण्यात आली.गेल्या काही काळात अल्पवयीन मुली, तरुणी; तसेच महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. त्यामुळे समाजात भीतिदायक, आव्हानात्मक वातावरण निर्माण झाले आहे. बऱ्याचदा पीडिता तक्रार करायला धजावत नाहीत, धाडस केल्यास पोलिसांकडून उदासीन प्रतिसाद मिळतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण देणे, त्यांच्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका तयार केली जावी. तक्रार नोंदविताना अथवा अत्याचारास प्रतिकार करण्याचे तिचे मनोधैर्य वाढल्यास अशा घटनांना काही प्रमाणात आळा बसू शकतो. त्यासाठी समुपदेशनाचाही उपयोग होऊ शकतो, असे मत कार्यकर्तींकडून व्यक्त करण्यात आले. (प्रतिनिधी)>विजय दर्डा म्हणाले, ‘लोकमतची आणि स्त्री चळवळीतील कार्यकर्तींची दिशा एकच आहे. ‘लोकमत’ने सखीमंच, ‘ती’चा गणपती, रॅली अशा माध्यमांतून स्त्रीसक्षमीकरणाचा जागर करून, महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. समाजामध्ये विषमता वाढत आहे, ती दुर्लक्षित राहत आहे. देश महासत्तेची स्वप्नं पाहत असताना आणि सुसंस्कृत प्रगत समाजाबद्दल चर्चा करताना, दुसरीकडे महिलांवरील अत्याचार क्लेश देणारे आहेत. या अत्याचारांना वाचा फोडण्याचा वसा ‘लोकमत’ने अंगीकारला आहे. त्याला पाठबळ देण्याचा तुमचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.’मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘एखादी घटना घडल्यावर प्रक्रियेला सुरुवात होते. ती गरजेची आहेच; मात्र अत्याचाराच्या घटना घडू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि विचारमंथन होण्यााची नितांत गरज आहे. आपल्याकडे पिढ्यान्पिढ्या आनुवंशिकतेतून पुरुषसत्ताक मानसिकता रुजलेली आहे. मुलगा श्रेष्ठ आणि मुलगी कनिष्ठ हे संस्कार आपोआप होतात. या संस्कारांच्या मुळाशी जायला हवे. मुलांना घडविणे हे अत्युच्च दर्जाचे काम आहे. त्यासाठी स्त्रीशिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. पालक सुशिक्षित असतील, तर मुलांवर आपोआपच संस्कार केले जातील. समाजमानस, पुरुषमानस कसे बदलेल, याबाबत मोठ्या प्रमाणात उकल करण्याची आवश्यकता आहे.’>एकट्या पालकांची मुले बऱ्याचदा एकटी पडतात. त्यातून ती वाममार्गाला लागण्याची शक्यता असते. अशा वेळी त्यांच्याबरोबर संवाद साधून फरक घडवून आणता येऊ शकतो. विविध स्तरातील स्त्रियांशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षणातून संस्कार व्हायला हवेत. पुरुषप्रधान मानसिकता बदलण्याची गरज आहे.- सुनंदा साळवे>महिला हक्कांच्या सनदेसाठी सूचनांचे स्वागतमहिला हक्कांची सनद सर्वसमावेशक व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. वाचकांकडून आलेल्या योग्य सूचनांचा समावेश या सनदेमध्ये करण्यात येणार आहे. समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला, गृहिणी, विद्यार्थिनी यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात येत आहे. आपल्या सूचना hellopune@lokmat.com   वर पाठवू शकता. पत्ता - शहर कार्यालय व्हिया वेन्टेज, १/२ मजला, सीटीएस ५५/२, एरंडवणे, लॉ कॉलेज रोड, पुणे-४११००४. ल्ल फोन (०२०) ६६८४८५८६ ल्ल फॅक्स : संपादकीय (०२०)-२५४२०३०६.- संपादक