सांगली : मूळचे सांगलीचे असलेले राजीव सीताराम तेरवाडकर तब्बल साडेसात हजार किलोमीटरचे अंतर कापून दक्षिण आफ्रिकेतून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सांगलीत आले आहेत. गेल्या दहा वर्षांत त्यांनी मतदानासाठी चार वाऱ्या केल्या आहेत.मतदान न करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. अशा स्थितीत तेरवाडकर यांनी मतदारांसमोर आदर्श निर्माण केला आहे. व्यवसायानिमित्त ते दक्षिण आफ्रिकेमध्ये असतात. तरीही निवडणूक आली की, सर्व कामे मार्गी लावून सांगलीला येतात. लोकसभा, विधानसभा, महापालिका अशा प्रत्येक निवडणुकीसाठी ते आवर्जून सांगलीला येतात आणि मतदान करून दक्षिण आफ्रिकेला परत जातात.एका मतामुळे काय होऊ शकते, याची मला कल्पना आहे. मतदानाबद्दल माझ्या मनात कर्तव्यभावना आहे. त्यामुळे मला कधीही या गोष्टींचा त्रास वाटला नाही.- राजीव तेरवाडकर
कौतुकास्पद! मतदानासाठी ‘ते’ आले आफ्रिकेतून सांगलीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 4:59 AM