शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

लाकडी नांगर इतिहासजमा होणार ?

By admin | Published: June 13, 2016 3:36 AM

बैलजोडीच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकरी हैराण झाले असून आता यांत्रिकी शेतीवर शेतकऱ्यांचा भर आहे.

वाडा : बैलजोडीच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकरी हैराण झाले असून आता यांत्रिकी शेतीवर शेतकऱ्यांचा भर आहे. त्यामुळे पारंपारिक लाकडी नांगरही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. कारण आजच्या आधुनिक युगात बैलांची नांगरणी थांबली असून त्या एैवजी शेतकरी पॉवर टिलरच्या वापराला प्राधान्य देतांना दिसतात.दरवर्षी ७ जूनला येणारा मान्सून या वर्षी अजून सुरू झाला नसला तरी शेतकऱ्यांची मात्र धावपळ सुरू झाली असून शेती उपयुक्त अवजारांच्या दुरूस्तीची शेतकऱ्यांची कामे जोरात सुरू आहेत. बी-बीयाणे, किटकनाशके, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत सध्या गर्दी आहे.महागाई वाढली तरी खेडयापाडयातील शेतकऱ्यांना शेती हाच पर्याय असल्याने त्यांच्याकडे डौलदार बैलांची जोडी लाकडी नांगरांच्या एक दोन जोडया या असणारच असा समज. एकदा जून महिना उजाडला की जमीन नांगरणीसाठी नांगर दुरूस्ती करणे, एखादा बैल कमी असल्यास बैल शोधणे, नवीन बैल खरेदी करणे, किंवा भाडयाने घेणे, नांगरणीसाठी लागणाऱ्या फळीसाठी मजबूत लाकुड शोधणे अशा कामांची शेतकऱ्यांची धावपळ सुरू होते. नांगर मजबूत टिकाऊ असावा यासाठी शेतकरी साग, शिसव, खैर या सारख्या वृक्षांच्या लाकडाचा वापर करतात. ग्रामीण भागातील शेतकरी आता मशागतीच्या कामासाठी पॉवर टिलरचा वापर करू लागले आहेत. लाकडी नांगराऐवजी पॉवर टिलरचा वापर केल्याने शेतकऱ्यांचा वेळ, पैसा, तसेच शारीरीक श्रम देखील वाचतात. साधारणपणे पॉवर टिलर दोन तासांत एक हेक्टर जमीन नांगरतो त्यामुळे नांगराच्या तुलनेत कमीत कमी वेळात जास्त जमीन नांगरली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)>पॉवर टिलरचे भाडे प्रतितास ४००पूर्वीच्या काळी शेतकरी लावणी, नांगरणी, पेरणी, आदि कामांसाठी एकमेकांच्या शेतात जाऊन मदत करीत असत. परंतु आता मजुरांची टंचाई व पावसाचा अनियमीतपणा यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या परिने आपल्या शेतीची कामे रोपणी, पेरणी लवकर करण्याचा प्रयत्न करतात. पॉवर टिलर भाडयाने घेणाऱ्या शेतकऱ्यांना ४०० रू. प्रतितास या भावाने पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बरेच शेतकरी शेतीच्या कामासाठी लाकडी नांगराऐवजी नांगरणीसाठी पॉवर टिलरच वापरतात. सध्या आॅर्चिड (मिनी) ट्रॅक्टरचाही वापर वाढला आहे.