पुणे : बालभारतीच्या हिंदी विषयांच्या पुस्तकामध्ये छापण्यात आलेल्या संविधानाच्या प्रस्तावनेत ‘धर्मनिरपेक्ष’शब्दा ऐवजी ‘पंथनिरपेक्ष’असा शब्द प्रसिद्ध करण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. उपरोक्त उल्लेखामुळे शिक्षणक्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र, केंद्र शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली संविधानाची प्रस्तावना जशीच्या तशी पुस्तकांमध्ये छापली असल्याचे बालभारतीच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.बालभारतीच्या मराठी विषयाच्या पुस्तकात धर्मनिरपेक्ष असा शब्द असून हिंदीच्या पुस्तकात पंथनिरपेक्ष, असा शब्द वापरण्यात आला आहे. हिंदीच्या पुस्तकामध्येही धर्मनिरपेक्ष शब्द का वापरण्यात आला नाही?, असा सवाल शिक्षण क्षेत्रात कार्यरत व्यक्तींकडून उपस्थित करण्यात आला आहे. बालभारतीचे संचालक सुनील मगर म्हणाले, बालभारतीकडून संविधानाच्या प्रस्तावनेचे भाषांतर करण्यात आलेले नाही. ४२ व्या घटनादुरुस्तीनुसार हा शब्द बदलण्यात आला असून बालभारतीच्या पुस्तकांमध्ये २०१३ पासून पंथनिरपेक्ष शब्द वापरला जात आहे. त्यावरून वाद होण्याचे कोणतेही कारण नाही. (प्रतिनिधी)
‘धर्मनिरपेक्ष’ऐवजी ‘पंथनिरपेक्ष’ शब्द
By admin | Published: May 04, 2016 3:06 AM