शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नेरळ स्थानकातील पुलाचे काम संथ गतीने

By admin | Published: March 03, 2017 3:04 AM

रेल्वे प्रशासनाने याच नेरळ स्थानकात मागील चार महिन्यांपासून नव्याने पादचारी पुलाचे काम सुरू केले आहे

नेरळ : मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकात अनेक वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या पादचारी पुलाचे काम रखडले असताना, रेल्वे प्रशासनाने याच नेरळ स्थानकात मागील चार महिन्यांपासून नव्याने पादचारी पुलाचे काम सुरू केले आहे. १८ फूट रुंदीचा हा नवीन पादचारी पूल करण्यात येणार असून या पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. हा पूल तयार झाल्याने, स्थानकातील जुना पूल त्यानंतर तोडला जाणार आहे; परंतु एक पादचारी पूल नेरळ स्थानकात अर्धवट अवस्थेत उभा असून त्याबाबत रेल्वे प्रशासन जाहीर भूमिका घेत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या अर्धवट पुलाचे कामही सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. माथेरान या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळी जाण्यासाठी नेरळ- माथेरान मिनीट्रेन चालविली जात आहे. त्यामुळे महत्त्वाचे जंक्शन स्थानक असलेल्या नेरळ रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने चांगली पावले उचलली आहेत. २००३मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री नितीश कुमार यांनी नेरळ स्थानकात पादचारी पूल बांधण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर नेरळ स्थानकात मुंबई एन्डकडे पादचारी पुलाची उभारणी करण्यास सुरु वात झाली. मात्र, पुलाचे काम अर्धवट झाल्यानंतर काही काळ पुलाचे काम बंद पडले होते. त्यानंतर ठेकेदार आणि रेल्वे यांच्यात झालेला वाद हा न्यायालयात प्रलंबित असल्याने गेली अनेक वर्षे पादचारी पुलाचे काम बंद आहे. नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने सातत्याने मागणी केल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने अखेर नेरळ स्थानकात नवीन पादचारी पूल मंजूर केला. मध्य रेल्वे व्यवस्थापकांच्या नेरळ भेटीच्या अनेक तारखा मागील चार महिने जाहीर होत होत्या. त्यामुळे नोव्हेंबर २०१६मध्ये पादचारी पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरु वात झाली.आता पुलाचे नेरळ स्थानकातील पायाचे बांधकाम पूर्ण झाले असून पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी मे २०१७ ही डेडलाइन देण्यात आली आहे. पुलावर गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाला मेगा ब्लॉकदेखील घ्यावा लागणार आहे. मात्र, नवीन पादचारी पुलामुळे नेरळ रेल्वे स्थानकात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सध्या नेरळ रेल्वे स्थानकात असलेला ९० वर्षांपूर्वीचा पादचारी पूल हा ९ फूट रु ंदीचा असून नवीन पुलाची रु ंदी ही १८ फूट म्हणजे ६ मीटर एवढी आहे. त्याचवेळी पुलावर चढताना प्रवाशांना अधिक जागा मिळणार असून हा पूल मे महिन्यात खुला झाल्यानंतर नेरळ स्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यात येणार आहे; परंतु मुंबई एन्डकडील अर्धवट अवस्थेतील पादचारी पूल कधी पूर्ण होणार? असा प्रश्न प्रवाशांना पडला असून अर्धवट अवस्थेत असलेला पादचारी पूल पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे. >नेरळ स्थानकात होणारा नवीन पूल जास्त रु ंदीचा होणार आहे. मात्र, त्याची उंची सध्या असलेल्या जुन्या पुलाच्या उंचीपेक्षा अधिक असल्याने चढ-उतार करताना प्रवाशांना त्रासदायक ठरणार आहे. नेरळ स्थानकातील अर्धवट अवस्थेत असलेला पूल पूर्ण केल्यास प्रवाशांना दिलासा मिळू शकेल. यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करावे. - संदीप म्हसकर, अध्यक्ष, प्रवासी संघटना>नेरळ रेल्वे स्थानकात सुरू करण्यात आलेल्या नवीन होणाऱ्या पादचारी पुलास एका बाजूने बदलापूर-ठाणे सारखी स्वयंचलित यंत्रणा बसविली तर प्रवाशंना जिना चढताना त्रास होणार नाही. जिना उतरण्यासाठी प्रवासी पायऱ्यांचा वापर करतील. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने विचार करावा, अशी मागणीदेखील प्रवाशांकडून केली जात आहे. सध्या नेरळ रेल्वे स्थानकात ९० वर्षांपूर्वीचा पादचारी पूल हा ९ फूट रु ंदीचा असून नवीन पुलाची रु ंदी ही १८ फूट म्हणजे ६ मीटर एवढी आहे. त्याच वेळी पुलावर चढताना प्रवाशांना अधिक जागा मिळणार असून हा पूल मे महिन्यात खुला झाल्यानंतर नेरळ स्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यात येणार आहे; परंतु मुंबई एन्डकडील अर्धवट अवस्थेतील पादचारी पूल कधी पूर्ण होणार? असा प्रवाशांचा प्रश्न आहे.