शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

तुम्हाला हव्या असलेल्या मुख्यमंत्र्यांसाठी कामाला लागा, बावनकुळेंनी म्हणताच फडणवीसांच्या नावाची...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 8:54 AM

मेदवार कोणी जरी असला तरी प्रत्येक जागेची जबाबदारी ही भाजपचीच असेल, असे मतही बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. राज्यातून ४५ खासदार ५१ टक्के मते घेऊन मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करतील. 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोण हवे आहे, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडकरी रंगायतनमध्ये जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना करताच एकमुखाने देवेंद्र फडणवीस...देवेंद्र फडणवीस, असा घोष कार्यकर्त्यांनी केला. लागलीच  तुम्हाला हव्या असलेल्या मुख्यमंत्र्यांसाठी कामाला लागा, असा सूचक सल्ला बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला. बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

‘भाजपच्या महाविजय २०२४’ अभियानांतर्गत बावनकुळे मंगळवारी ठाण्यात आले होते. रंगायतन येथे त्यांनी ६०० वॉरीअर्सना मार्गदर्शन केले. यात ठाणे, ओवळा-माजिवडा, कळवा-मुंब्रा आणि कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते. २०२४ मध्ये तुम्हाला मुख्यमंत्रिपदी कोण हवंय? असे त्यांनी विचारताच ‘देवेंद्र फडणवीस’ यांचे नाव कार्यकर्त्यांनी एकमुखाने घेतले.  त्यावर मला नीट आवाज ऐकू येत नसून जोरात बोला, असे बावनकुळे म्हणाले. यानंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा ‘देवेंद्र फडणवीस’ यांच्या नावाचा घोष करताच तुम्हाला हव्या असलेल्या मुख्यमंत्र्याकरिता कामाला लागा, असे सूचक विधान केले.

पदाधिकाऱ्यांची घेतली हजेरीज्या ज्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकण्यात आली होती, त्यांना बोलावून सरल ॲपविषयी माहिती आहे का? आज त्यावर काय अपडेट आली आहे, आदी प्रश्न त्यांनी केले. अनेकांना त्याची उत्तरे देता आली नाही, त्यावरून त्यांनी नाराजी तर व्यक्त केलीच शिवाय पदाधिकाऱ्यांची कानउघाडणीही केली. जो बूथ लेव्हलला काम करीत आहे, त्याचा फोटो बॅनरवर नसतो. परंतु, बॅनर लावताना बूथ लेव्हलच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा फोटो लावा व नेत्यांचे छोटे फोटो लावा, अशी सूचनाही त्यांनी केली. मी २० मिनिटे भाषण करणार आहे, ते शांततेत ऐका, अन्यथा बाहेर जाऊन गप्पा मारा, अशा शब्दांत त्यांनी काही पदाधिकाऱ्यांनाही सुनावले.

‘इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही’मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही सर्व पक्षांची इच्छा आहे. यापूर्वीच मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते. मात्र, उद्धव ठाकरेंच्या चुकांमुळे आरक्षण मिळाले नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे. परंतु, ते देताना इतरांच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक जागेची जबाबदारी भाजपची!कोण, कुठे उभा राहणार, कोणती जागा कोणाला मिळणार, याचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी कमिटी, राज्यातील महायुतीचे तीन नेते आणि इतर घटक पक्षातील महत्त्वाचे नेते घेतील. आमच्यात कुठेही मतभेद नाहीत किंवा मनभेदही नाहीत, उमेदवार कोणी जरी असला तरी प्रत्येक जागेची जबाबदारी ही भाजपचीच असेल, असे मतही बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. राज्यातून ४५ खासदार ५१ टक्के मते घेऊन मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करतील. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा