शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पादचारी पुलाचे काम अद्याप सुरूच

By admin | Published: August 06, 2016 2:31 AM

वाशी - कोपरखैरणे रोडवर सेक्टर ९ व १५ दरम्यान पादचारी पूल बांधण्यासाठी जुलै २०१५ मध्ये भूमिपूजन केले होते.

नवी मुंबई : वाशी - कोपरखैरणे रोडवर सेक्टर ९ व १५ दरम्यान पादचारी पूल बांधण्यासाठी जुलै २०१५ मध्ये भूमिपूजन केले होते. बांधकामाची मुदत संपल्यानंतरही अद्याप काम सुरूच झालेले नाही. परंतु पादचारी पूल बांधण्याचे काम प्रगतिपथावर असल्याची खोटी माहिती प्रशासनाने दिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेचे प्रथम संदर्भ रुग्णालय, शाळा, मंदिर, व्यापारी संकुल, भाजी व कपडा मार्केटमुळे सेक्टर ९ व १५, १६ मध्ये मोठ्या प्रमाणात रहदारी होत असते. रस्ता ओलांडावा लागत असल्याने अनेक वेळा अपघात होत असून वारंवार वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व अपघात थांबविण्यासाठी येथे पादचारी पूल बांधण्याची मागणी नागरिक व लोकप्रतिनिधींनी केली होती. सिंधूताई नाईक नगरसेविका असताना त्यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून पालिकेने जानेवारी २०१२ मध्ये या प्रस्तावास मंजुरी दिली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण करून २० जानेवारी २०१५ मध्ये पादचारी पूल बांधण्यासाठी ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला. २१ जून २०१६ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अद्याप काम सुरूही झालेले नाही. ठेकेदाराने येथील महावितरण कार्यालयाला लागून पदपथ खोदला आहे. समोरील बाजूलाही खोदकाम केले होते. दोन्ही पदपथ वाहतुकीसाठी बंद करून ठेवले आहेत. पादचारी पुलाचे काम कधी पूर्ण होणार अशी विचारणा स्थानिक नगरसेविका अंजली वाळुंज यांनी सर्वसाधारण सभेमध्ये केली होती. याविषयी आयुक्तांनी प्रशासनाच्यावतीने लेखी उत्तर दिले आहे. काम पूर्ण करण्याची मुदत संपली आहे. येथील काम प्रगतिपथावर आहे. निविदेमधील अटी व शर्तीनुसार दंड आकारून कंत्राटदाराकडून लवकरात लवकर काम पूर्ण केले जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. प्रशासनाच्या उत्तराविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पादचारी पुलाचे काम ठप्प आहे. काम सुरूच झाले नसताना ते प्रगतिपथावर आहे असे उत्तर कसे काय दिले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)>पूल शबरी हॉटेलजवळ हवाशाळा, रुग्णालय, मार्केट असल्यामुळे या परिसरात नियमित गर्दी असते. यामुळे शबरी हॉटेलजवळ पादचारी पूल बांधण्याची गरज आहे. पालिकेने चुकीच्या ठिकाणी पुलाचे नियोजन केले असून जागेमध्ये बदल करून लवकर काम पूर्ण करण्यात यावे. - सुरेश तुकाराम शिंदे, सदस्य, जिल्हा नियंत्रण व दक्षता कमिटी, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र शासन