लोकमत न्यूज नेटवर्कपुणे/कोल्हापूर : ‘एवढी वर्षे ज्या उद्देशाने मी लेखन, बालनाट्य, थेट अनुभव यातून मुलांसाठी काम करत आहे, त्या कामाचे फलित पुरस्काराच्या रुपाने मिळाले आहे, अशी भावना साहित्यिक ल. म. कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. धरणग्रस्तांच्या प्रश्नावर आधारित ‘खारीच्या वाटा’ या कादंबरीसाठी कडू यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या कादंबरीची पहिली आवृत्ती २०१३ मध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी बालसाहित्य पुरस्कार, दमाणी पुरस्कार तसेच बी. रघुनाथ पुरस्काराने गौैरवण्यात आले आहे. ‘साहित्य अकादमीच्या पुरस्काराने आनंद तर झालाच आहे; त्याचबरोबर जबाबदारीचीही नव्याने जाणीव झाली आहे,’ असेही कडू यांनी सांगितले.राहुल कोसंबींना युवा पुरस्कार साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार प्राप्त झालेले राहुल पांडुरंग कोसंबी राधानगरी तालुक्यातील चांदेकोते येथील रहिवासी आहेत. त्यांच्या ‘उभं-आडवं’ या वैचारिक लेखसंग्रहाला हा पुरस्कार मिळाला आहे. आपल्याभोवती घडणाऱ्या घटनांचे त्यांनी यामध्ये विश्लेषण केलं आहे. एनबीटीच्या पश्चिम क्षेत्रीय मुंबई कार्यालयाचे प्रभारी अधिकारी म्हणून ते सध्या काम पाहतात. कुठल्याही साहित्यिक पुरस्कारासाठी लिखाण करत नाही. परंतु वाचकांना आपण लिहिलेले आवडते की नाही, याचे कायम कुतूहल असते. या राष्ट्रीय पुरस्कारामुळे वाचकांची पोचपावती मिळाली असून याचा खूप अनंद आहे. - राहुल कोसंबी
पुरस्काराने कामाचे चीज झाले - ल. म. कडू
By admin | Published: June 23, 2017 2:01 AM