ऑनलाइन लोकमतमालेगाव, दि. 27 - केंद्र शासनाने केलेली नोटाबंदी, ठप्प झालेला यंत्रमाग व्यवसाय, हाताला रोजगार नसल्याने व आजारी पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या येथील यंत्रमाग कामगाराने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. शेख चाँद कमरूद्दीन (५५) हे या कामगाराचे नाव आहे. मंगळवारी ही घटना घडली. शेख चाँद कमरूद्दीन यांच्या कुटुंबात पत्नी, चार मुली, तीन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून यंत्रमाग व्यवसायातून रोजगार मिळत नव्हता. यंत्रमाग मालकांकडून पाचशे व एक हजारच्या नोटा देण्यात येत होत्या. पत्नीवर मुंबई येथे उपचार सुरू होता. औषधे व उपजीविका भागविण्यासाठी नोटांची टंचाई जाणवली. यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेख चाँद यांनी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याचा दावा त्यांचे पुतणे नईम शेख यांनी केला आहे. या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जारवाल करीत आहेत.
नोटाबंदीमुळे मालेगावात कामगारांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच
By admin | Published: December 27, 2016 9:19 PM