मुंबई : विविध कामगार संघटनांनी संघर्ष करून तयार केलेल्या कामगारहिताय कायद्यात केंद्र व राज्य सरकार कामगारविरोधी बदल करत आहेत. परिणामी, कामगारांनी स्वत:च्या हक्कांसाठी एकजूटीने संघर्षष करण्याचे आवाहन कामगार संघटना कृती समितीने सोमवारी केले. कामगार दिनाच्या निमित्ताने कृती समितीने दादर पूर्वेकडून लोकमान्य टिळक उड्डाणपुलावरून काढलेल्या पदयात्रेचे रुपांतर वनमाळी सभागृहात आल्यावर जाहीर सभेत झाले. यावेळी कृती समितीच्या नेत्यांनी कामगारांना मार्गदर्शन केले.या निर्धार सभेमध्ये कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सहनिमंत्रक विश्वास उटगी, आयटकचे सुकुमार दामले, सिटुचे डॉ. विवेक मॉंन्टेरो, हिंद मजदूर सभेचे शंकर साळवी, गोदी कामगारांचे नेते मारुती विश्वासराव आणि अन्य कामगार नेते उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेशात राहणाऱ्या तळागाळातील कामगारांपर्यंत पोहचून एकजूट साधण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच एसटी व बीएसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न, रेल्वेच्या विविध कामांचे होत असलेले खासगीकरण अशा विविध मुद्द्यांवर लढा देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.उटगी म्हणाले की, बहुमताच्या आधारावर कामगार विरोधी धोरण राबवणाऱ्या सरकारविरोधात सर्व कामगार संघटनांनी कृती समितीसोबत लढा द्यावा. त्यासाठी प्रथम कामगार नेत्यांनी आपापसातले मतभेद दूर ठेवावेत. केवळ कामगारहित डोळ््यासमोर ठेवल्यास एकजूट सहज शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले. विश्वासराव यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या १ हजार ८०० एकर जागेचा विकास करण्याचा प्रश्न यावेळी उपस्थित केला. (प्रतिनिधी)परिषदेचेही आयोजनकामगारविरोधी धोरण हाणून पाडताना सरकारविरोधात लढा उभारण्यासाठी कृती समितीची बैठक लवकरच पार पडेल. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. त्यानंतर महिन्याभरात प्रमुख कार्यकर्त्यांची परिषदही पार पडेल.
कामगारांनो, हक्कांसाठी एकजूट ठेवा!
By admin | Published: May 02, 2017 5:01 AM