शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

शेकडोंच्या उपस्थितीत सृष्टीचा विश्वविक्रम

By admin | Published: August 24, 2014 1:15 AM

चिमुकल्या सृष्टी शर्माने शनिवार अविस्मरणीय ठरविला. लिंबो स्केटिंगमध्ये १६.५ सेंटिमीटर इतक्या लहान उंचीमधून सहीसलामत बाहेर पडून या दहा वर्षांच्या खेळाडूने विश्वविक्रमी कामगिरी करीत

लिंबो स्केटिंंग : १६.५ सेंटिमीटर उंच बारमधून बाहेर पडली, गिनीज बुकात नोंद होणारनागपूर : चिमुकल्या सृष्टी शर्माने शनिवार अविस्मरणीय ठरविला. लिंबो स्केटिंगमध्ये १६.५ सेंटिमीटर इतक्या लहान उंचीमधून सहीसलामत बाहेर पडून या दहा वर्षांच्या खेळाडूने विश्वविक्रमी कामगिरी करीत नागपूरला नवी ओळख दिली. सृष्टीची ही कामगिरी लवकरच गिनीज बुकात नोंदली जाणार आहे.लोकमत मीडिया लिमिटेडतर्फे कॅम्पस् क्लब व बालविकास मंच अंतर्गत ‘बेटी बचाव’ मोहिमेंतर्गत झाशी राणी चौकातील माहेश्वरी सभागृहात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चेन्नईचा मॅडविन डेव्हा याने जून २०१४ रोजी नोंदविलेला २३ सेंटिमीटर उंचीचा विक्रम मागे टाकण्यासाठी सृष्टीने १९ सेंटिमीटर उंचीपासून सुरुवात केली. ही उंची पार करताच तिचा विश्वविक्रम पूर्ण झाला होता. पण तरीही निर्धार कायम होता. मग १८ सेंटिमीटर , १७ सेंटिमीटर आणि त्याहूनही लहान १६.५ सेंटिमीटरची उंची तिच्या निर्धारात व्यत्यय आणू शकली नाही. मुलीच्या देदीप्यमान कामगिरीने वडील धर्मेंद्र, आई शिखा, बहीण सिद्धा यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. शब्द सुचेनासे झाले होते. वडिलांनी या विशेष मोहिमेसाठी लोकमतचे आभार मानले. सृष्टीच्या विश्वविक्रमी कामगिरीचे साक्षीदार होण्यासाठी लोकमत मीडिया लिमिटेडचे चेअरमन खा. विजय दर्डा, संचालक (परिचालन) अशोक जैन, संचालक (तांत्रिक) सेवानिवृत्त विंग कमांडर रमेश बोरा, महाराष्ट्र स्केटिंग असोसिएशनचे महासचिव प्रा. उपेंद्र वर्मा, प्रभारी क्रीडा संचालक विजय संतान, वेकोलितील एरिया ट्रेनिंग आॅफिसर दिनेश चौरसिया, मोहोड बिल्डसचे संचालक सतीश मोहोड, लोकमत समाचारचे प्रॉडक्ट हेड मतीन खान, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्रा आदी प्रामुख्याने उपस्थित होते. खा. दर्डा यांनी सृष्टीचा शाल, श्रीफळ , पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन लोकमत समूहाच्यावतीने गौरव केला.सुरुवातीला लोकमतचे संस्थापक, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा ‘बाबूजी’ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. दीप प्रज्वलनाद्वारे कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक मतीन खान यांनी केले. सृष्टीच्या कामगिरीचे साक्षीदार होण्यासाठी स्केटिंग खेळाडू, पालक, आणि लोकमत कॅम्पस क्लबचे शेकडो सदस्य उपस्थित होते. सर्वांसाठी आयोजकांतर्फे गीत संगीत आणि नृत्यांची मेजवानी सादर करण्यात आली. (प्रतिनिधी)भावनात्मक क्षण : खा. दर्डा लोकमत मीडिया लिमिटेडचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी चिमुकली स्केटर सृष्टीच्या प्रयत्नांचे कौतुक करीत हा भावनात्मक क्षण असल्याचे सांगितले. ते म्हणाले,‘ सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत या दहा वर्षांच्या कन्येने नवा विश्वविक्रम नोंदविला आहे. या यशामागे सृष्टी आणि तिच्या मातापित्यांची मेहनत तसेच बहीण सिद्धीची जिद्द आहे. प्रत्येकाकडे काहीतरी गुण असतो. पण योग्य व्यासपीठ मिळण्याची खरी गरज आहे. ‘कोशिश करने वालो की हार नही होती’ हे सृष्टीने स्वप्रयत्नांतून सिद्ध केले आहे.’