पुणे : आषाढी वारीनिमित्त जिल्ह्यातील सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना कडूनिंबाच्या रोपांचे वाटप करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विश्वविक्रम करण्याच्या तयारीत आहेत. दि. २३ जून रोजी विद्यापीठाच्या मुख्य क्रीडांगणावर होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील सुमारे २० हजार विद्यार्थ्यांचा यावेळी सहभाग असेल.समर्थ भारत अभियानांतर्गत यंदा ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी’ ही संकल्पना घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे ३५ हजार स्वयंसेवक आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. यानिमित्त दि. २३ जून ते १५ जुलै या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पत्रकार परिषदेत या उपक्रमांची माहिती दिली. प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. विलास उगले आदी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व विद्यापीठाच्या समन्वयातून आणि शिवाजी विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सहकार्याने उपक्रम घेण्यात येणार आहेत.एकाच वेळी एकाच प्रकारची रोपे वाटपाचा विक्रम यापुर्वी दुबई येथील एका शाळेच्या नावावर आहे. या शाळेने ९ हजार ४०० रोपांचे वाटप केले आहे. आता विद्यापीठाकडून सुमारे १५ हजार कडूनिंबाची रोपे वाटून नवीन विक्रम करण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. आषाढी वारीदरम्यान दोन्ही वारीमार्गांवर ५० लाख पत्रावळ््यांचे वाटप व संकलन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वारीदरम्यान गोळा होणाºया कचºयाचे कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे. सुमारे ३५ स्वयंसेवकांमार्फत प्रत्येक एक याप्रमाणे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यांसह विविध प्रबोधन, स्वच्छता कार्यक्रम, आरोग्य शिबीरे घेण्यात येणार आहे. वारीमध्ये विद्यापीठाच्या प्रत्येकी २०० विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली दिंडीही दोन्ही मार्गांवर संपुर्ण वारीत सहभागी होणार आहे. ------------------विद्यापीठाच्या वारीची वैशिष्ट्य - १५ हजार रोपांच्या वाटपाचा विक्रम करणार- ५० लाख पत्रावळ््यांचे वाटप व संकलन- ३५ मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य शिबीरे- वारी मार्गावर ३५ हजार वृक्षारोपण- कचºयाची कंपोस्ट खतनिर्मिती--------------------------
कडूनिंबाची रोपे वाटपाचा होणार विश्वविक्रम : आषाढी वारीनिमित्त उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 12:42 PM
एकाच वेळी एकाच प्रकारची रोपे वाटपाचा विक्रम यापुर्वी दुबई येथील एका शाळेच्या नावावर आहे.
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थितीजिल्ह्यातील सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना कडूनिंबाच्या रोपांचे वाटप