जयंत धुळप - अलिबाग
नैसर्गिक स्वच्छता आणि त्यायोगे पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने निसर्गचक्रातील अत्यंत महत्त्वाचा पक्षी मानल्या जाणा:या आणि पर्यावरणीय प्रदूषणामुळे दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ‘गिधाड’ या पक्षाच्या संरक्षण व संवर्धनाच्या कामात प्रेमसागर मेस्त्री या निसर्गप्रेमी तरुणाने स्वत:ला तब्बल 11 वर्षे झोकून दिले; आणि रायगड जिल्ह्यातील म्हसळे तालुक्यातील चिरगाव येथील गिधाडांच्या संख्येत नैसर्गिकरीत्या वाढ करण्याच्या त्यांच्या 11 वर्षाच्या अथक प्रयत्नांना यश आले.
त्यांच्या या असाधारण कामगिरीची दखल मध्य आशियातील मंगोलिया देशातील ‘डेनव्हर झू’ या संस्थेकडून घेण्यात आली आहे. प्रेमसागर यांची भारतातून एकमेव ‘वैज्ञानिक पक्षी अभ्यासक’ म्हणून मध्य आशियातील मंगोलियातील डेनव्हर झू या संस्थेकडून येत्या 31 जुलै ते 28 ऑगस्ट या कालावधीत होणा:या या ‘आंतरराष्ट्रीय गिधाड प्रजाती वैज्ञानिक अभ्यासा’करिता निवड करण्यात आली आहे. यामुळे चिरगाव ग्रामस्थ व वनखात्याच्या मेहनतीला प्रशस्ती मिळाली आहे. यामुळे चिरगाव येथील गिधाड संवर्धन प्रकल्पाचे रूप पालटेल असा आशावाद प्रेमसागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे. अमेरिकेतील डेनव्हर झूऑलॉजिकल सोसायटी फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून जगभरात अनेक देशांतील अनेक ठिकाणी पक्षी, प्राणी आणि त्यांचा आधिवास याचे सर्वेक्षण, संवर्धन व संरक्षण करण्याचे काम सातत्याने होत आहे. इंग्लंड येथील रॉयल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ बर्डस् (आरएसपीबी), पेरीग्रीन फंड यासारख्या इतर संस्था भारतामध्ये चालणा:या गिधाड संवर्धन प्रकल्पास वैज्ञानिक संशोधनासाठी व असे प्रकल्प व्यवस्थित उभारण्यासाठी मार्गदर्शन करतात. अशा परदेशी संस्थांची एशियन रॅप्टर्स रिसर्च कॉन्झर्वेशन कॉन्फरन्स नेटवर्क (एआरआरसीएन) या महासंस्थेच्या वतीने संवर्धनाचे प्रयत्न एकत्रितपणो करण्यासाठी कार्यरत असल्याचे प्रेमसागर यांनी सांगितले.
1मंगोलिया येथील स्टेपीचा गवताळ प्रदेश जगप्रसिद्ध भूभाग सर्वाना परिचित आहे. या ठिकाणी गिधाडे जमिनीवर घरटी करतात. तसेच गोल्डन ईगल, स्टेपी ईगल आणि अनेक स्थलांतरित पक्षी या ठिकाणी पाहावयास मिळतात. या परिसरात जवळपास 43 टक्के लोक हे भटकेविमुक्त जमातीतील असल्यामुळे हा भाग अविकसित आहे. त्यामुळे येथील नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन नैसर्गिकरीत्या झालेले आहे.
2या भागातून भारतामध्ये गरुड, ससाणो, शाही ससाणो, करकोचे असे अनेक शिकारी पक्षी स्थलांतरित होत असतात. तसेच टुंड्रा प्रदेशातील अनेक समुद्री पक्षी लाखोंच्या संख्येने भारताकडे प्रवास करताना विश्रंतीकरिता या ठिकाणी उतरतात. यामुळे हा भाग उत्तरध्रुवीय तसेच सायबेरीयन पक्षांच्या स्थलांतरासाठी अतिशय महत्त्वाचा भूप्रदेश आहे. डेनव्हर झू ही अशा प्रदेशात काम करणारी संस्था आहे. यासाठी वैज्ञानिक संशोधक म्हणून प्रेमसागर मेस्त्री यांची झालेली निवड ही भारतीय पक्षी अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची व गौरवास्पद मानली जात आहे.
मंगोलियातील 25क् किमीच्या प्रवासात युरोशिन ब्लॅक व्हलचर्सचा होणार अभ्यास 31 जुलै ते 28 ऑगस्ट या कालावधीत मंगोलियामधील ‘ईख नॉर्थ रिझव्र्ह’ या ठिकाणी जवळपास 25क् किमीच्या प्रवासात युरोशिन ब्लॅक व्हलचर्स (गिधाडाची एक प्रजाती) या प्रजातीचा अभ्यास करण्यासाठी प्रेमसागर मेस्त्री यांची निवड करण्यात आली आहे. सध्या ते मुंबई विद्यापीठात बायोडायव्हर्सिटी या विषयात पक्षांच्या अधिवासाविषयी वैज्ञानिक प्रबंध लिहीत आहेत. यासाठी त्यांना ठाण्यातील बी.एन. बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. माधुरी पेजावर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
चिरगाव ग्रामस्थ व सहकारी सुखावले : अठ्ठावीस दिवसांच्या मंगोलियातील या संशोधन अभ्यासामध्ये संस्थेकडून गिधाड पक्षाला टॅगिंग, ग्लोबल पोङिाशन सिस्टीम (जीपीएस), टेलिमेट्री युनिट बसविणो, पायामध्ये रिंग टाकणो आणि शास्त्रीय परीक्षणाच्या नोंदी व स्थानिक स्थलांतराचा अभ्यास या विषयांचा समावेश आहे. प्रेमसागर मेस्त्री हे अशा गिधाड अभ्यासासाठी निवड होणारे भारतातील पहिलेच अभ्यासक आहेत. या त्यांच्या यशाबद्दल चिरगाव ग्रामस्थ, तेथील वनखात्याचे सहकारी, कोकणातले पक्षी अभ्यासक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
च्6 ते 9 फेब्रुवारी 2क्14 रोजी पुणो येथील पाषाण परिसरातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अँड एज्युकेशन रिसर्च सेंटर (आयसर) संस्थेमध्ये पुणो येथील इला फाउंडेशन संस्थेअंतर्गत डॉ. सतीश पांडे यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये म्हसळे येथील चिरगाव गिधाड अभ्यास केंद्राकडून गिधाड संवर्धनाविषयी वैज्ञानिक माहिती सादर करण्यात आली. या वेळी आलेल्या अभ्यासकांनी म्हसळे येथील चिरगाव प्रकल्पास भेट दिली.
च्या वेळी उपस्थितांना सीस्केप सोसायटी ऑफ इको एन्डेंजर्ड स्पेसीज कंझव्र्हेशन अँड प्रोटेक्शन संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी गिधाड संवर्धनाविषयी सविस्तर माहिती दिली होती. हा प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये नाणोमाची, पाली, वडघर, ताम्हीणी, सोनघर, कृष्णानगर आदी भागांमध्ये संस्था कशी चालविते याविषयी उपस्थितांना स्लाईडशोद्वारे माहिती दिली.
च्या वेळी उपस्थितांमध्ये ‘डेनव्हर झू’चे अध्यक्ष रिचर्ड रिडींग यांनी त्यांच्या संस्थेद्वारे मंगोलिया, इस्नयल, अमेरिका, पाकिस्तान आदी देशांमध्ये गिधाड प्रकल्पांविषयी चालू असलेल्या वैज्ञानिक संशोधनाबद्दल प्रेमसागर मेस्त्री यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि पुढील शास्त्रीय अभ्यासासाठी त्यांना आमंत्रित केले.