- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : कुपोषणमुक्तीसाठी सरकार विविध योजना, कार्यक्रम राबविले जात असतांनाही महाराष्ट्रावरील कुपोषणा कंलक पूर्णत: मिटलेला नाही, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारी दिसते. महाराष्ट्रात पाच वर्षापेक्षा कमी वयाची ३६ टक्के मुले कमी वजनाची आणि ३४ टक्के मुले खूपच ठेंगणी आहेत. या कुपोषित मुलांपैकी १०.५ टक्के मुले अत्यंत कमी वजनाची (९.४ किलो) तर ३८ टक्क्यांहून अधिक मुले अत्यंत ठेंगणी आहेत. तथापि, सर्वाधिक कुपोषित असलेल्या बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या तुलनेत कुपोषित मुलांचे महाराष्ट्रातील प्रमाण कमी आहे.केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकसभेत सांगितले की, या कुपोषित मुलांची रोगप्रतिकारक क्षमता खूप कमी असते. परिणामी ते अनेक रोगांच्या ससंर्गामुळे अपंगही होऊ शकतात. तथापि, यासंदर्भातील प्रमाणित आकडेवारी नाही. मुलांमधील कुपोषण दूर करण्यासाठी एकीकृत बालविकास योजना राबवली जाते. याशिवाय सूक्ष्म पोषण, अतिसार नियंत्रण, माता-शिशू सुरक्षा, रोग प्रतिबंधक, बालक शूश्रूषा कार्यक्रमही चालविण्यात येतात. मागच्या दहा वर्षांत बालकांच्या पोषण स्थिती सुधारणा झाली आहे.त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार २००५-०६ मध्ये ५ वर्षापेक्षा कमी वयाची ४८ टक्के मुले बुटकी होती. आज हे प्रमाण ३८ टक्क्यांवर आले आहे. तसेच कमी वजनाच्या मुलांची संख्या ४२.५ वरून ३२.७ टक्क्यांवर आहे. रक्तक्षय असलेल्या बालकांची संख्या ६९.४ वरून ५८.५ टक्क्यांवर आले आहे.
चिंताजनक! महाराष्ट्रात कुपोषणामुळे ३६% मुलं कमी वजनाची
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 2:04 AM