स्वत:च्या एकजुटीची चिंता करा, देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टाेला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 06:12 AM2022-08-17T06:12:07+5:302022-08-17T06:12:26+5:30
Devendra Fadnavis : पत्र परिषदेत फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार शेतकरी व इतरांसाठी जे करू शकले नाही ते, ते आम्ही करावे अशी अपेक्षा अजित पवार आता आमच्याकडून व्यक्त करीत आहेत, त्यांचा आमच्यावर एवढा विश्वास आहे ही चांगली गोष्ट आहे.
मुंबई : आम्ही निर्णयांचा सपाटा लावला आहे तरीही तुम्ही टीका करीत आहात. या टीकेपेक्षा तुमच्या एकजुटीची चिंता करा, महाविकास आघाडीतील तीन पक्षांची तोंडे तीन दिशांना आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना हाणला.
पत्र परिषदेत फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार शेतकरी व इतरांसाठी जे करू शकले नाही ते, ते आम्ही करावे अशी अपेक्षा अजित पवार आता आमच्याकडून व्यक्त करीत आहेत, त्यांचा आमच्यावर एवढा विश्वास आहे ही चांगली गोष्ट आहे. आम्ही त्यांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करू. आमच्या सरकारला ते बेइमानीचे, विश्वासघाताचे सरकार म्हणत आहेत, आम्ही तर जनमताचा आदर करणारे शिवसेना-भाजप युतीचे सरकार दिले आहे.
आज आघाडीत विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून वाद सुरू आहे, काँग्रेसने नाराजीचा सूर लावला आहे. ४६ दिवसांत लोकांना बदल दिसत आहे. लोकांना आपले सरकार आल्याचे वाटत आहे, असा टोलाही फडणवीस यांनी हाणला.