शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

चिंता सरली; धरणे भरली, समाधानकारक पावसामुळे धरणांमध्ये वाढला जलसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 1:38 PM

Water: राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असून, धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील १३८ मोठ्या धरणांतील सरासरी पाणीसाठा ९० टक्के झाला आहे. २६० मध्यम प्रकल्प ७१ टक्के भरले असून, २५९९ लघु प्रकल्पांत ४७ टक्के साठा झाला आहे.  

- बाळासाहेब बोचरे मुंबई  - राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असून, धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील १३८ मोठ्या धरणांतील सरासरी पाणीसाठा ९० टक्के झाला आहे. २६० मध्यम प्रकल्प ७१ टक्के भरले असून, २५९९ लघु प्रकल्पांत ४७ टक्के साठा झाला आहे.  

आजच्या घडीला विविध प्रकल्पांत मिळून ४०८१३.९७ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.  १३८ मोठ्या धरणांपैकी ४० धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर ४५ धरणांमध्ये ९० टक्क्यांच्या वर साठा आहे. ३५ धरणे ७० टक्क्यांच्या वर भरली आहेत. ९० टक्क्यांच्या वर भरलेल्या धरणांतून विसर्ग सुरू आहे. 

राज्यातील १३८ मोठ्या प्रकल्पांची साठवण क्षमता ३५५४३.२९ द.ल.घ.मी असून सध्या ३२८३९.२९ द.ल.घ.मी. इतका साठा आहे. एकूण उपयुक्त साठवण क्षमता २९०६६.९९ द.ल.घ.मी. आहे. सर्व प्रकल्पांत मिळून  २६३१८ द.ल.घ.मी. इतका उपयुक्त साठा आहे.

मध्यम प्रकल्पात ७१ टक्के पाणीराज्यात २६० मध्यम प्रकल्प असून, त्यांची साठवण क्षमता ६१८२.४४ दलघमी आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये ४५८४.९७ दलघमी म्हणजे ७१ टक्के साठा आहे. २,५९९ लघू प्रकल्प असून, यामध्ये ४८ टक्के पाणीसाठा झाला आहे. लघू प्रकल्पांची साठवण क्षमता ६५२९ दलघमी असून, या प्रकल्पात सध्या ३,३८९ दलघमी साठा आहे. 

मराठवाड्याची चिंता दूर- राज्यात सर्वत्र पाऊस सुरू असताना मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरविली होती. मात्र, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात नाशिकसह मराठवाड्यात झालेल्या समाधानकारक पावसाने मराठवाड्यातील धरणे भरून वाहू लागली आहेत. - नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे जायकवाडी ९० टक्के भरले आहे. त्यामुळे मराठवाड्याची चिंता दूर झाली आहे.

दोन वर्षांनंतर १००% भरले कोयना सातारा  जिल्ह्यात पाऊस वाढल्याने कोयना धरणात ही पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर कोयना धरण १०० टक्के भरले. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सहा दरवाजे एक फुटाने उचलून साडेनऊ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी