- लक्ष्मण मोरेपुणे - लहान मुलांप्रमाणेच किशोरवयीन नुकतेच तारुण्यात प्रवेश केलेली मुले ‘स्क्रिन अॅडिक्शन’च्या आवेगात वाहवत जाऊ लागली आहेत. सोशल मीडियावरील अतिसक्रिय असणे, व्हॉट्स अॅपसारख्या मेसेजिंग अॅपवर खर्च केला जाणारा अमर्यादित वेळ आणि गेम्सच लागलेलं वेड या मुलांची ऊर्जा खर्चच होऊ देत नाही. त्यातच पॉर्न अॅडिक्ट होण्याचेही प्रमाण वाढीस लागल्याने लैंगिकतेविषयी योग्य माहिती मिळण्याऐवजी विकृत माहिती या मुलांची दिशा भरकटवित आहे.मुलांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ लागला असून, सतत भांडणे, विचित्र वागणे आणि पालकांना प्रसंगी मारहाण अशा घटना घडू लागल्या आहेत. मुलांच्या वागण्याबोलण्यात दिवसेंदिवस घडू लागलेले आमूलाग्र बदल, त्यातून वाढत चाललेली अस्वस्थता, पॉर्न आणि स्क्रिन अॅडिक्ट होणे, नको त्या गोष्टींची लत लागणे, सिगरेट, तंबाखू, मद्यासह हुक्का आणि मेफेड्रोनसारख्या अमली पदार्थांची ओढ लागणे ही पालकांसमोरची फार मोठी समस्या बनली आहे. दर दहा कुटुंबांमध्ये दोन कुटुंंबांत ही समस्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालकांना मुलांच्या या ‘अॅडिक्शन’ला कसा लगाम घालावा, हेच समजेनासे झाले आहे. शहरातील व्यसनमुक्ती केंद्रांकडे पालकांच्या शेकडो तक्रारी फोन कॉल्सद्वारे आणि प्रत्यक्ष भेटीमधून येऊ लागल्या आहेत. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना ‘इंटरनेट आणि स्क्रिन अॅडीक्शन’वर वेगळे समुपदेशन कक्ष उघडावे लागले आहेत.स्मार्ट टीव्हीचा रिमोटही मोबाईलवरचबाजारामध्ये आलेले स्मार्ट टीव्ही वापरण्याकडे कल वाढलेला आहे. या टीव्ही संचामध्ये यू ट्यूब, नेटफ्लिक्स, अमेझॉन आदींसारखे अॅप देण्यात आले आहेत. केवळ वायफायवर हे सर्व अॅप सुरू होतात.स्मार्ट मोबाईल फोनमध्येगुगलच्या प्ले स्टोअरमधूनकोणत्याही टीव्ही किंवा डीटीएच कंपनीचा रिमोट डाऊनलोड करून घेता येतो.त्यामुळे मोबाईल आणि टीव्ही यांचा एकाच वेळी वापर करणाºयांची संख्याही वाढत चालली आहे.किशोरवयीन आणि महाविद्यालयीन मुलांमध्ये व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यू ट्यूबचा सर्वाधिक वापर केला जातो. अन्य सर्व अॅप्समध्ये ‘लॉग आऊट’चा आॅप्शन असतो. मात्र, व्हॉट्सअॅप आणि यू ट्यूबमध्ये हा आॅप्शन नाही.व्हॉट्सअॅपवर विविध ग्रुप्सवर अश्लील क्लिप्सच्या आणि विनोदांची देवाणघेवाण होत असते. त्यामुळे लैंगिक विकृतीची शक्यता आहे. यू ट्यूबवर लैंगिकतेविषयी माहिती मिळवण्याचाही या वयातील मुले प्रयत्न करीत असतात. मात्र, त्यांना योग्य ज्ञान मिळेलच याची खात्री नसते.विकृत आणि चुकीची माहिती त्यांच्यासमोर येण्याची शक्यता असते. अनेकदा घरातीलएखाद्या व्यक्तीच्या मोबाईलवर आलेली अश्लील व्हिडीओ क्लिपही पाहिली जाते.लाइव्ह असणे धोक्याचेफेसबुक लाइव्हचे वेडही मुलांमध्ये पाहायला मिळत आहे. रात्रीची जागरणे, चॅटिंग आणि गेम्ससोबतच फेसबुक, इन्स्टाग्रामवर लाइव्ह राहण्याची सवय जडू लागली आहे. एफबी लाइव्ह करून ड्रायव्हिंगचा स्पीड दाखविताना अपघातामध्ये अनेक तरुणांचे बळी गेले आहेत.अनलिमिटेड डाटा हवाय कशाला?जवळपास सर्वच मोबाईल कंपन्या आता अमर्यादित इंटरनेट डाटा अशा योजना ग्राहकांना देत आहेत. त्यामुळे मुले सतत इंटरनेटवर असतात. त्यामुळे एकमेकांशी असलेला संवाद हरवत चालला आहे. मुले इंटरनेटद्वारेच एकमेकांशी लिंक करून व्हिडीओ गेम्स खेळतात. सतत पुढच्यास्टेजबाबत त्यांच्यामध्ये उत्कंठा असते. त्यामुळेवाचन होत नाही....आजारपणाची लक्षणेचष्मा लागणे, डोळ्यांचे आजारभुकेवर नियंत्रण न राहणेअभ्यासात लक्ष न लागणेगेम्सचे व्यसन लागणेआक्रमक होणेपुरेशी झोप न होणेमणक्याचे आणि मानेचे आजार1 फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपवर लाईक, कमेंट आल्या नाहीत तर मुलांची प्रचंड चिडचिड सुरू होते. एकमेकांना फोन करून तू लाइक, कमेंट का केली नाही यावरून मुले वाद घालतात. यासोबतच एफबी लाइव्हचे प्रमाण वाढले आहे. त्यामधून घडलेल्या अपघातात काही तरुणांना प्राणही गमवावे लागले आहेत.2फेसबुक , व्हॉट्सअॅप तसेच इन्स्टाग्रामवर ठेवले जाणारे स्टेट्स सतत पाहिले जातात. या स्टेटस ठेवण्यावरूनही अनेकदा भांडणे होतात. कोणाला तरी आनंद देण्यासाठी, खिजवण्यासाठी तसेच दहशत माजविण्यासाठीही या स्टेटसचा वापर केला जातो.काही महिन्यांपूर्वी चाकणमध्ये अशाच प्रकारे व्हॉट्स अॅपवरील स्टेटसमुळे तरुणाचा खून करण्यात आला होता.व्हिडीओ कॉल्स आणि न्यूड चॅटिंग धोकादायकफेसबुक, व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडीओ कॉलिंगचे प्रमाण वाढले आहे. यासोबतच तरुण तरुणींमध्ये ‘न्यूड चॅटिंग’चे प्रमाण वाढले आहे. एकमेकांना न्यूड फोटो आणि स्वत:चेच अश्लील व्हिडीओ पाठविण्याचे प्रकार घडू लागले आहेत. यामधून ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडतात. मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे.
चिंताजनक : ‘सोशल मीडिया’मुळे तरुणाई बेफाम, लैंगिकतेविषयी विकृत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 2:21 AM
लहान मुलांप्रमाणेच किशोरवयीन नुकतेच तारुण्यात प्रवेश केलेली मुले ‘स्क्रिन अॅडिक्शन’च्या आवेगात वाहवत जाऊ लागली आहेत.
ठळक मुद्देलहान मुलांप्रमाणेच किशोरवयीन नुकतेच तारुण्यात प्रवेश केलेली मुले ‘स्क्रिन अॅडिक्शन’च्या आवेगात वाहवत जाऊ लागली आहेत. सोशल मीडियावरील अतिसक्रिय असणे, व्हॉट्स अॅपसारख्या मेसेजिंग अॅपवर खर्च केला जाणारा अमर्यादित वेळ आणि गेम्सच लागलेलं वेड या मुलांची ऊर्जा खर्चच होऊ देत नाही पॉर्न अॅडिक्ट होण्याचेही प्रमाण वाढीस लागल्याने लैंगिकतेविषयी योग्य माहिती मिळण्याऐवजी विकृत माहिती या मुलांची दिशा भरकटवित आहे