शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
3
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
4
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
5
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
6
"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
7
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
8
'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...
9
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
11
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
12
१० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन
13
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
14
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
15
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
16
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
17
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
18
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
19
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
20
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर

... तर दिवसात पैशांनी पोते भरले असते !

By admin | Published: March 12, 2015 12:44 AM

मंडलिक यांच्या आठवणी : कुटुंबासाठी काही करू शकलो नाही ही बोच

विश्वास पाटील-कोल्हापूर -मला पैसेच गोळा करायचे असते आणि वही घेऊन पीए ठेवला असता तर दिवसात पोते भरेल एवढे पैसे मी कधीही गोळा करू शकलो असतो परंतु राजकीय जीवनात तो मार्ग मी कधीच पत्करला नाही. सामान्य गोरगरीब माणूस आजही माझ्या मागे का येतो हेच त्याचे कारण असल्याचे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक सातत्याने बोलून दाखवत. अनेक लढाया लढूनही ते त्यात यशस्वी का झाले, त्याचेही हेच कारण असावे...मंडलिक यांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्यावर काल मंगळवारी मुरगूडला अंत्यसंस्कार झाले. एक झंझावात शांत झाला. मागचे काही दिवस महाराष्ट्रासाठी वाईट गेले. ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांची हत्या व माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि मंडलिक यांच्या निधनाने सामान्य माणसाला मोठा धक्का बसला. कारण या तिन्ही नेत्यांची सामान्य जनतेशीच नाळ जोडलेली होती. स्वच्छ चारित्र्य आणि विचारांची बांधीलकी हा या तिघांना जोडणारा समान धागा होता. त्यामुळे आज दिवसभरही सगळीकडे त्याबद्दलच दु:खाची भावना व्यक्त झाली.मंडलिक यांच्यासोबत गेली अनेक वर्षे सावलीसारखे राहिलेल्या अमर पाटोळे, संजय भोसले यांच्यासह वीसहून अधिक जणांना तर आजचा दिवस कमालीचा वेदनादायक गेला. कारण आपलाच वडील गेल्याचे दु:ख त्यांनी अनुभवले. क्षण अन् क्षण त्यांचा मंडलिकसाहेबांच्या आठवणींतच गेला. या सर्वांशी बोलताना मंडलिकसाहेब दोन-तीन गोष्टी सातत्याने व्यक्त करत. कुटुंबासाठी काही करता आले नाही याची बोच त्यांना सतत वाटत असे. समाजासाठी ज्यांना काम करायचे आहे, त्याने लग्न करू नये, असे ते नेहमी म्हणत.मंडलिक हे चारवेळा आमदार व चारवेळा खासदार, एकदा राज्यमंत्री होते. आता कोणत्याही कामासाठी लोकप्रतिनिधींकडूनही टक्केवारी लावली जाते. त्याअनुषंगाने चर्चा सुरू झाली की ते म्हणायचे,‘अरे मला पैसेच गोळा करायचे असते तर दिवसाला पोते भरेल एवढे पैसे मी सहज जमा करू शकलो असतो..परंतु तो माझा पिंड नाही. माझ्याकडे येणारा माणूस सगळीकडे प्रयत्न करून थकल्यानंतर येतो. मंडलिकसाहेबांकडून काहीतरी मदत होईल असे त्याला वाटे. हा गोरगरिबांना वाटणारा विश्वास हीच माझी संपत्ती आहे. त्या संपत्तीच्या बळावरच मी आतापर्यंतच्या सगळ््या लढाया लढलो आणि जिंकलोही. त्यामुळे त्या विश्वासाला मी कधी बट्टा लागून देणार नाही.’मंडलिक यांना कार्यकर्त्यांची चांगली पारख होती. त्यांना भेटायला आलेला माणूस घराबाहेर पडला की ते लगेच त्याचे मूल्यमापन करायचे. खरेच कोण आपल्याला मदत करणारा आहे व कोण नुसताच अंदाज काढणारा आहे, याचे मर्म ते ओळखत. कागल तालुक्याच्या राजकीय लढाईत त्यांना टोकाच्या संघर्षाला सामोरे जावे लागले परंतु त्यालाही ते कधी डगमगले नाहीत. मी मरणार असेल तर देवही वाचवू शकणार नाही आणि जगणार असेल तर देवही मारू शकणार नाही, असे त्यांचे साधे सरळ तत्त्वज्ञान. त्यानुसारच ते जगले आणि इहलोकीचा प्रवास संपल्यानंतरच निघून गेले. मागे कार्य व गदगदायला लावणाऱ्या आठवणी ठेवून...!सांत्वनासाठी मुरगूडला नेत्यांची रीघज्येष्ठ नेते माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना भेटून सांत्वन करण्यासाठी बुधवारी दिवसभर मुरगूडला विविध स्तरांतील लोकांची रीघ लागली. प्रा. संजय मंडलिक व कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली.मंडलिक यांचे रक्षाविसर्जन आज, गुरुवारी मुरगूडला आहे. मंडलिक यांच्यावर तिथेच जय शिवराय एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे संजय मंडलिकही आणखी काही दिवस मुरगूड येथेच थांबणार आहेत. बुधवारी दिवसभर कागलसह राधानगरी, भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यांतील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते दिवसभर येत होते.सकाळी साडेसात वाजता आमदार महादेवराव महाडिक यांनी प्रा. मंडलिक यांची भेट घेतली. काही व्यक्तिगत कामांमुळे त्यांना काल अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहता आले नव्हते. त्यांच्याशिवाय माजी मंत्री विलासकाका उंडाळकर, मदन पाटील, कर्नाटकचे माजी मंत्री मल्हारराव पाटील, माजी खासदार उमेश कत्ती, माजी आमदार भगवानराव साळुंखे, डॉ. प्रकाश शहापूरकर, गुलाबराव घोरपडे, अरुण इंगवले, बाळासाहेब सरनाईक यांच्यासह अनेकांनी भेटून आधार दिला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून मंडलिक यांचे सांत्वन केले.