शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून पत्नीचा खून

By admin | Published: July 07, 2015 2:01 AM

चारित्र्याच्या संशयावरून तीसवर्षीय पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्यानंतर पतीने बाहेर जाऊन विषप्राशन केले.

फलटण (जि. सातारा) : चारित्र्याच्या संशयावरून तीसवर्षीय पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्यानंतर पतीने बाहेर जाऊन विषप्राशन केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी मध्यरात्री फलटण तालुक्यातील खटकेवस्ती येथे हा प्रकार घडला. या छळप्रकरणी सासू, सासरा व दीराच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.खटकेवस्ती येथील महादेव माळाजी गायकवाड व सुनीता या दाम्पत्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून वारंवार भांडणे होत होती. त्यांना बारा वर्षांची मुलगी व दहा वर्षांचा मुलगा आहे. मुलगी शिक्षणासाठी मामाकडे राहते. सततच्या त्रासाला कंटाळून सुनीता काही दिवस माहेरी राहिली होती. पाच-सहा दिवसांपूर्वी पुन्हा ती पतीकडे आली होती.रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास महादेवने धारदार कुऱ्हाडीने गाढ झोपेत असलेल्या सुनीताच्या मानेवर घाव घालून खून केला. त्यानंतर महादेव तेथून पळून गेला. सकाळी साडेसहाच्या सुमारास सुनीता का उठली नाही, हे बघण्यासाठी तिची सासू कुपदी तेथे आली, तेव्हा सुनीता मृतावस्थेत आढळली. हा प्रकार पाहिल्यानंतर सासूने आरडाओरड करत नवरा व दुसऱ्या मुलाला याची माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थ व नातेवाइकांनी पोलिसांना माहिती दिली.फलटण ग्रामीण पोलिसांनी बेपत्ता महादेवचा शोध घेतला. मात्र, त्याचा तपास लागला नाही. गावातच लपून बसलेला महादेव सायंकाळी चारला विषप्राशन करून अचानक घरी आला. तेथे उपस्थित पोलिसांनी त्याला फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. खूनप्रकरणी महादेव याच्यावर गुन्हा नोंदविला असून, जाचहाटप्रकरणी सासरा माळाजी, सासू कुपदी, दीर संजय यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. (प्रतिनिधी)