शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Amruta Fadnavis : जागतिक कामांबद्दलचं नोबेल गेलं, पण अमृता फडणवीस यांना भारतरत्न द्या, हरी नरकेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 6:52 PM

Amruta Fadnavis : पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले. तसंच यावेळी त्यांना संताप अनावर झाला होता.

Amruta Fadnavis on Nawab Malik : मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो ट्वीट केला. त्यानंतर भाजपचे ड्रग्स पेडलरशी काय कनेक्शन? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांवर आरोप लावले. दरम्यान, या प्रकारानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन नवाब मलिकांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मलिकांचे आरोप फेटाळून लावले. परंतु यावेळी त्यांना संताप अनावर झाल्याचं दिसत होतं. या एकंदरीत घटनेवरून प्रा. हरी नरके यांनी अमृता फडणवीस यांना खोचक टोला लगावला.

अमृता फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर प्रा. हरी नरके यांनी फडणवीस यांना खोचक टोला लगावला. "मी अशी शिफारस करतो की, त्यांच्या जागतिक कीर्तीच्या कामांबद्दल त्यांना नोबेल गेला बाजार भारत रत्न तरी प्रदान करण्यात यावं. या गाण्याला पैसा पुरवणारा (निर्माता) ड्रगमाफिया सध्या गुजरातमध्ये तुरुंगात आहे. तो भाडोत्री होता असा खुलासा केला तर त्यांनी अशा दुय्यमतीय्यम दर्जाच्या माणसाचे नाव काल श्रेय नामावलीतून हटवले. अशा माणसाबरोबर फोटो काढून घेतला तेव्हाची त्यांची देहबोली बघा. जो माणूस इतका तिय्यम होता त्याला अंगठा दाखवत हसत फोटो काढतात? अनोळखी माणसाबरोबर अशी पोज देतात? तुम्ही काहीही खुलासे केले तरी या फोटोमधली चित्रभाषा लोकांना समजते बरं!," असं ते म्हणाले. काय म्हणाल्या होत्या फडणवीस?"तुम्हाला बिघडे नवाब व्हायचं आहे, तुम्हाला बिघडे नवाबची जी एनर्जी आहे ती सुधरे नवाबमध्ये कन्व्हर्ट करा, तरंच महाराष्ट्र पुढे जाईल. अन्यथा आपलं खरं नाही. मलिक जाणीवपूर्वक आम्हाला टार्गेट करत आहेत, आमच्याकडे ना लँड बँक आहे, ना साखर कारखाने आहेत, त्यामुळे आम्ही कोणाला घाबरत नाही," असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं होतं. नवाब मलिक हे बेनकाब होत आहेत, काही सूचत नाही, निगेटीव्हीटी आलेली असते तेव्हा असं केलं जातं. सरळ मार्गाने जाणाऱ्या महिलांना का डिवचता, तेच आज माझ्यासोबत केलं जातंय. तुम्ही मर्द आहात ना मग देवेंद्रजींना डायरेक्ट टार्गेट करा, मला मध्ये नका आणू. माझ्या अंगावर कुणी आलं तर, मी सोडणार नाही. सोशल एक्टीव्हीस्ट म्हणून माझे विचार प्रकट करत असते आणि ते यापुढेही करत राहणार, असेही अमृता फडणवीस यांनी ठणकावून होतं.

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसnawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस