शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

‘रायटर’ लिहितात ठाण्यांचे भविष्य

By admin | Published: June 10, 2014 1:04 AM

आपला पसारा वाढवत अधिक व्यापक काम करणार्‍या ‘रायटर’चे पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार वाढविण्यात महत्त्वाचे योगदान आहे. दोन वर्षापूर्वी अंबाझरी आणि नुकतेच सदर ठाण्यात झालेल्या प्रकरणाने ही बाब

अपराधी कर्मचार्‍यांना जागा : अधिकार्‍यांना आश्रयजगदीश जोशी - नागपूरआपला पसारा वाढवत अधिक व्यापक काम करणार्‍या ‘रायटर’चे पोलीस स्टेशनमध्ये  भ्रष्टाचार वाढविण्यात महत्त्वाचे योगदान आहे. दोन वर्षापूर्वी  अंबाझरी आणि नुकतेच सदर ठाण्यात झालेल्या प्रकरणाने ही बाब समोर आली आहे. अनेकदा या ‘रायटर’ सोबत मोठय़ा अधिकार्‍यांचे वाद होतात.  पण त्यांना सर्वतोपरी आश्रय दिला जात असल्याने हेच ‘रायटर’ आता भस्मासूर झाले आहेत. पोलीस निरीक्षकाकडे गंभीर अपराध किंवा तक्रारींची तपासणी करण्यासह प्रशासकीय जबाबदारीही असते. पोलीस निरीक्षकाकडे प्रलंबित तपासणीची  केस डायरी तयार करण्यासह सर्व महत्त्वपूर्ण कामांचे दस्तावेजांची पाहणी करण्याची जबाबदारी ‘रायटर’कडे असते. या कामाच्या बदल्यात पोलीस  निरीक्षकाला मिळणारा ‘हप्ता’ आणि त्याचे व्यवस्थापन ‘रायटर’ करतात. महिन्याला लाखो रुपयांचा बंदोबस्त करून देणार्‍या‘रायटर’ समोर त्यामुळेच  निरीक्षकही नतमस्तक असतात. त्यामुळे पोलीस निरीक्षकानंतर ‘रायटर’चाच बोलबाला असतो. ठाण्यातील बड्या पदावरील अधिकारीही ‘रायटर’च्या  भानगडीत फारसे पडत नाहीत. शहरात एकूण २३ पोलीस स्टेशन आहेत. अधिकांश पोलीस स्टेशनची सत्ता ‘रायटर’च्याच हातात आहे. एकदा ‘रायटर’चे पद मिळविल्यावर त्याला  या पदावरून हटविण्याची हिंमत कुणीच करू शकत नाही. ‘रायटर’चे काम करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांच्या शक्तीचा परिचय यावरून मिळतो. निर्धारित कालावधीचा कार्यकाळ पूर्ण केल्यावरही त्यांची बदली होण्याची शक्यता कमी असते. काही कारणाने बदली झालीच तरी नव्या जागेवर त्यांना  पुन्हा ‘रायटर’चेच पद मिळण्याची व्यवस्था करण्याची त्यांची ताकद आहे. ‘रायटर’चे काम करण्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांना संगणक साक्षर असणे,  टंकलेखन करता येणे आवश्यक आहे. पण असे अनेक ‘रायटर’ आहेत ज्यांनी संगणकाच्या की-बोर्डलाही कधीच हात लावलेला नाही. ‘मनी  मॅनेजमेंट’च्या भरवशावर त्यांना टंकलेखन करणारा सहायक मिळतो. हा सहायकच ‘रायटर’चे सारे काम पाहतो.  याच अर्थ व्यवस्थापनाच्या बळावर काही ठाण्यात गुन्हे कारवायात लिप्त असलेल्या काही पोलीस कर्मचार्‍यांना ‘रायटर’चे पद मिळाले आहे.  जरीपटका ठाण्यात एका गुन्ह्यात सापडलेल्या हवालदाराला ‘रायटर’ करण्यात आले आहे. या हवालदाराच्या सूचनेनेच २00८ साली एका गुन्हे  प्रकरण घडले होते. त्यानंतर हे दरोडेखोर गुन्हेगार चंद्रपुरात पकडले गेले.  त्यानंतर हवालदाराच्या सूचनेवरूनच त्यांनी फरार असणे मान्य केले. या  आधारावर त्या हवालदाराला अटक करण्यात आली. दोन महिन्यानंतर जमानतीवर त्याची सुटका करण्यात आली. निलंबन संपल्यावर त्याची नियुक्ती मुख्यालयात क रण्यात आली. सध्या हा हवालदार तीन  वर्षापासून त्याच्या निरीक्षकासाठी अर्थ व्यवस्थापन पाहतो आहे. काही काळ पोलीस निरीक्षक आणि आणि दुय्यम पोलीस निरीक्षकांमध्ये या प्रकरणावरून तणावाची स्थितीही होती. पोलीस निरीक्षक अर्थपूर्ण  व्यवहारात ‘रायटर’च्या मदतीने स्वत:च प्रकरणांचा निपटारा करतात. पण ज्या प्रकरणात काही ‘अर्थ’ नसतो. अशी प्रकरणे दुय्यम निरीक्षक किंवा  इतर अधिकार्‍यांना सोपविली जातात. गेल्या आठवड्यात पोलीस विभागात सामान्य बदली अंतर्गत काही ‘रायटर’ला मुख्यालयात पाठविण्यात आले आहे. या अपमानाने आणि कमाई बंद  झाल्याने त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. ही बदली रद्द व्हावी म्हणून ते बड्या अधिकार्‍यांशी संगनमत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अंबाझरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण राऊतवार प्रकरणात ‘रायटर’ची भूमिकाच महत्त्वाची होती. पण सारवासारव करून त्यावर पडदा  टाकण्यात आला. ठाण्यांशिवाय सहायक आयुक्तांच्या ‘रायटर’चीही स्थिती अशीच आहे. ते अनेक वर्षांपासून अर्थ व्यवस्थापन करीत आहेत.  त्यांच्याकडे अनेकांचे दुर्लक्ष आहे.