मुंबई : काही दिवसांपूर्वी निवडणुकांविषयी बॉलीवूडच्या कलाकार, दिग्दर्शकांनी एकत्र येत आपले म्हणणे सामान्यांसमोर मांडले. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता १०५ मराठी लेखक, प्रकाशक आणि संपादकही एकत्र आले आहेत. मतदानाच्या हक्काविषयी सामान्यांना आवाहन करणारे निवेदन त्यांनी लिहिले आहे. त्यात मतदानाचा अधिकार जबाबदारीने वापरण्याचा संदेश या सर्वांनी एकत्रितरीत्या दिला आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, वाढत्या समाजविघातक प्रवृत्तीचा केवळ निषेध करून भागणार नाही तर ठोस कृती करून तिचा निपटारा करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशी कृती करण्याची संधी आपल्याला सार्वत्रिक निवडणुकांच्या रूपाने राज्यघटनेने उपलब्ध करून दिलेली आहे. येत्या काही दिवसांतच होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदान करून भारताच्या सार्वभौम लोकशाहीचे रक्षण करणारे सरकार निवडण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. या जबाबदारीचे महत्त्व सामान्यांनी जाणले पाहिजे.
मराठी लेखक, प्रकाशक आणि संपादकांमध्ये भालचंद्र नेमाडे, महेश एलकुंचवार, जयंत पवार, शफाअत खान, रामदास भटकळ, लैला भटकळ, शांता गोखले, हरिश्चंद्र थोरात, श्याम मनोहर, रत्नाकर मतकरी, सतीश आळेकर, नीरजा, रणधीर शिंदे, प्रज्ञा दया पवार, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, हेमंत दिवटे, नितीन रिंढे, संध्या नरे पवार, हरी नरके, संजय पवार, प्रेमानंद गज्वी, अजय कांडर, श्रीधर नांदेडकर, अशोक बागवे, अरुण शेवते, संध्या गोखले, मिलिंद चंपानेरकर, दत्ता पाटील, प्राजक्त देशमुख, सुमती लांडे, धर्मकीर्ती सुमंत, मकरंद साठे, आशुतोष पोतदार, अतुल पेठे, रवींद्र लाखे, मनस्विनी लता रवींद्र, ओम्कार गोवर्धन अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे.टोळ्यांना अभय देणाऱ्यांना ओळखाच्आपले मत कुणाला द्यायचे वा द्यायचे नाही, हे ठरविण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्या अधिकाराचा आदर राखून आम्ही मराठी लेखक सर्व सुजाण नागरिकांना असे आवाहन करतो की, आपण आपला मतदानाचा अधिकार जबाबदारीने वापरू या.च्आपल्या मनात दुसºया धर्माबद्दल, दुसºया जातीबद्दल, दुसºया माणसांबद्दल द्वेष निर्माण करणाºया शक्ती कोणत्या आहेत ते ओळखू या. अशा द्वेषभावनांना पोसणारे आणि हिंसक कृत्ये करून समाजात दहशत माजवणाºया टोळ्यांना अभय देणारे राजकारणी कोण आहेत ते ओळखू या.च्जनतेच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना बगल देऊन राष्ट्रवादाचा फुगा फुगविण्यामागचे राजकारण जाणून घेऊ या; आणि अशा शक्तींना येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ या. ती वेळ आता आलेली आहे. आपली लोकशाही आणि तिने दिलेले स्वातंत्र्य शेवटी आपल्यालाच जपायचे आहे, त्याची बूज राखायची आहे. कारण त्यातच आपले आणि समाजाचे स्वास्थ्य दडलेले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.