काँग्रेसच्या एका चुकीच्या ट्विटमुळे राहुल गांधी झाले ट्रोल, राजा राममोहन राय यांच्या जन्मतारखेचा घातला घोळ

By वैभव देसाई | Published: September 29, 2017 11:03 PM2017-09-29T23:03:46+5:302017-09-29T23:05:36+5:30

राजा राममोहन राय यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करण्यात आलं होतं. काँग्रेसच्या या ट्विटमुळे ट्विटरक-यांनी राहुल गांधींना अक्षरशः धारेवर धरलं आहे.

A wrong tweet of Congress led Rahul Gandhi to put the troll, Raja Rammohan Rai's birth date | काँग्रेसच्या एका चुकीच्या ट्विटमुळे राहुल गांधी झाले ट्रोल, राजा राममोहन राय यांच्या जन्मतारखेचा घातला घोळ

काँग्रेसच्या एका चुकीच्या ट्विटमुळे राहुल गांधी झाले ट्रोल, राजा राममोहन राय यांच्या जन्मतारखेचा घातला घोळ

Next

मुंबई - राजा राममोहन राय यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करण्यात आलं होतं. काँग्रेसच्या या ट्विटमुळे ट्विटरक-यांनी राहुल गांधींना अक्षरशः धारेवर धरलं आहे.
 
ट्विटमध्ये लिहिलं होतं, राजा राममोहन राय जे बंगालच्या सुधारणेचे प्रणेते आणि स्त्रियांच्या अधिकारांसाठी झगडणारे समाज सुधारक होते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. काँग्रेसनं ट्विटर अकाऊंटवरून त्यांचा फोटोही टाकला होता. मात्र त्या फोटोमध्ये एक गंभीर चूक होती. 


फोटोत राजा राममोहन राय यांच्या जन्मदिवसाच्या तारखेच्या ऐवजी पुण्यतिथीची तारीख आणि पुण्यतिथीच्या तारखेला जन्मदिवसाची तारीख टाकण्यात आली होती. काँग्रेसनं दोन्ही तारखा चुकवल्या होत्या. त्यामुळे ट्विटरकर काँग्रेस व पर्यायानं राहुल गांधींवर तुटून पडले. त्यानंतर काँग्रेसला स्वतःच्या चुकीची उपरती झाली. दुसरं एक ट्विट करत काँग्रेसनं या चुकीबद्दल क्षमाही मागितली. राजा राममोहन राय यांच्यासारखाच आमचा डिझायनरही काळाच्या पुढे चालतोय, असं म्हणत एक स्मायलीही टाकलं होतं. 



एका ट्विटरकरानं काँग्रेसला धारेवर धरत म्हटले की, काँग्रेस सूट बूट की सरकार म्हणत मोदी सरकारवर टीका करत सुटलेली असताना चुकांचा पाढाही वाचते आहे. अशा किती चुका काँग्रेस सुधारणार आहे ?. एकानं तर राहुल गांधी यांनी काँग्रेसचं हे ट्विटर हँडल वापरणे बंद करावे, अशी सूचनाच केली आहे. तर तिस-या एकानं तर राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे. ये राहुल गांधी काही काम है. दुनिया में ऐसे इंटेलिजन्ट कोयी हैही नही. जन्म आणि मृत्यूची तारीख तुम्ही बदलली. त्यामुळेच जनतेनं तुम्हाला घरी बसवलं.





Web Title: A wrong tweet of Congress led Rahul Gandhi to put the troll, Raja Rammohan Rai's birth date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.