शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

वाईच्या भाजपा नगराध्यक्षांना लाच घेताना अटक

By admin | Published: June 10, 2017 2:55 AM

वाईच्या भाजपाच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे व त्यांचे शिक्षक पती सुधीर शिंदे यांना शुक्रवारी ठेकेदाराकडून १४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाई (जि. सातारा) : वाईच्या भाजपाच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे व त्यांचे शिक्षक पती सुधीर शिंदे यांना शुक्रवारी ठेकेदाराकडून १४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.संबंधित ठेकेदाराने वाईमध्ये सार्वजनिक शौचालयाची कामे केली होती. त्या कामाचे १ लाख ४० हजार बिल काढण्यात आले होते. त्या काढलेल्या बिलाच्या मोबदल्यात तसेच उर्वरित कामाचे ८ लाखांचे प्रलंबित बिल काढण्यासाठी दहा टक्के प्रमाणे १४ हजार रुपयांची मागणी नगराध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी ठेकेदाराकडे केली होती. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत विभागाकडे रीतसर तक्रार नोंदविली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.पती सुधीर शिंदे यांनी त्यांच्या दवाखान्यामध्ये संबंधित ठेकेदाराला पैसे घेऊन बोलावले होते. या वेळी स्वत: नगराध्यक्ष प्रतिभा शिंदेही तेथे हजर होत्या. संबंधित ठेकेदाराने १४ हजारांची रोकड सुधीर शिंदे यांच्या हातात देताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तर लाचेची मागणी केल्यामुळे प्रतिभा शिंदे यांनाही तत्काळ अटक करण्यात आली. शिंदे या पेशाने डॉक्टर असून, केवळ एक मताने भाजपाकडून थेट जनतेतून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे, वाई नगरपालिकेत विरोधी राष्ट्रवादीच्या आघाडीची सत्ता आहे. त्यांचे पती द्रविड हायस्कूलमध्ये पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. दोघांनाही न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.