कोल्हापूर : उसाला एकरकमी एफआरपी देण्याचे साखर कारखानदारानी मान्य केल्याने ऊसदराची कोंडी शनिवारी दुपारी फुटली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखाने सोमवारपासून सुरू होत आहेत. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर वगळता उर्वरित महाराष्ट्रात चक्का जाम करण्यावर ठाम आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात शनिवारी दुपारी कोल्हापूरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता एकरकमी एफआरपी आणि साखरेचा बाजारातील दर ३४00 रुपये क्विंटल झाल्यावर १00 व दर ३५00 झाला तर आणखी १00 द्यायचे मान्य झाले. यामुळे सर्वच साखर कारखाने सोमवारपासून सुरु राहतील.
उसदराची कोंडी फुटली, मात्र कोल्हापूर वगळता उर्वरित महाराष्ट्रात चक्का जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 3:21 PM
उसाला एकरकमी एफआरपी देण्याचे साखर कारखानदारानी मान्य केल्याने ऊसदराची कोंडी शनिवारी दुपारी फुटली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखाने सोमवारपासून सुरू होत आहेत. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर वगळता उर्वरित महाराष्ट्रात चक्का जाम करण्यावर ठाम आहे.
ठळक मुद्देउसदराची कोंडी फुटलीकोल्हापूर वगळता उर्वरित महाराष्ट्रात चक्का जाम