मुंबई : सर्व स्तरातून उमटलेली प्रतिक्रिया, शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने आणि वडील सलीम खान यांच्या सल्ल्यानंतर सिनेअभिनेता सलमान खान याने १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटांतील सिद्धदोष आरोपी याकूब मेनन याच्या फाशीच्या शिक्षेविरोधात केलेले वादग्रस्त टिष्ट्वट अखेर मागे घेतले. माझ्याकडून अनावधानाने एखादा गैरसमज पसरविला गेला असेल, तर त्याबद्दल मी विनाअट माफी मागतो, असेही त्याने म्हटले आहे. सलमानने चौदा टिष्ट्वट करून याकूबचा फरार भाऊ आणि स्फोटांचा मुख्य सूत्रधार टायगर याला फासावर लटकविण्यात यावे, याकूबला नव्हे, असे मत व्यक्त केले होते. त्या टिष्ट्वटवर सर्व स्तरांतून प्रतिक्रिया उमटली. सपाचे अबू आझमी यांनी त्याचे समर्थन केले, तर सेना-भाजपाने त्यावर तीव्र आक्षेप नोंदविला. सलमानने आपले टिष्ट्वट मागे घेतले नाही, तर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही अॅड. निकम यांनी दिला होता.सलमानचे आधीचे ट्विटटायगरसाठी भावाला फासावर चढविण्यात येत आहे. अरे टायगर कुठे आहे? भारतात टायगरचीच कमतरता आहे. टायगरला आणा. मला तीन दिवसांपासून हे ट्विट करायचं होतं. पण मी घाबरत होतो. पण यात एका व्यक्तीचं कुटुंब गुंतलं आहे. भावाला लटकवू नका.आणि त्याला कुणीही कधीही टायगर म्हणू नका. तो त्या नावाच्या लायक नाहीए. त्यालाच लटकवा.नंतरचे ट्विटयाकूब निर्दोष असल्याचे म्हटले नव्हते. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मुंबई स्फोटात अनेक लोकांचे बळी गेले होते. मी नेहमीच म्हणत आलो आहे, की एकाही निष्पाप व्यक्तीचा बळी हा मानवतेचा खून आहे.माझ्या वडिलांनी मला फोन केला आणि माझे ट्विट गैरसमज पसरवू शकतात, त्यामुळे मी ते मागे घ्यावेत, असे सांगितले. म्हणून मी ते मागे घेत आहे. माझ्याकडून अनावधानाने जर एखादा गैरसमज पसरविला गेला असेल, तर त्याबद्दल मी विनाअट माफी मागतो.माझे ट्विट धर्मविरोधी असल्याचे जे म्हणत आहेत, त्यांचा मी निषेध करतो. मी सर्व धर्मांचा आदर करत आलो आहे व यापुढेही करेन.मी माझ्या मुलाच्या मताशी अजिबात सहमत नाही. त्याने पूर्ण माहितीअभावी अशा गंभीर विषयांवर भाष्य करू नये, जनतेने त्याचे विधान गांभीर्याने घेऊ नये. - सलीम खान
याकुबसाठी बंजरगी भाईजानची टिवटिव!
By admin | Published: July 27, 2015 1:27 AM