- योगेश पांडे, नागपूर१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषसिद्ध आरोपी याकूब मेमनच्या फाशीसाठी अखेरच्या दिवशी तुरुंगात युद्धस्तरावर सराव करण्यात आला. त्याला फाशी देण्यासाठी पुण्यातील विशेष प्रशिक्षित तीन पोलीस कर्मचाऱ्यांना बोलविले असून याकूबच्या मृतदेहाचे हस्तांतरण त्यांच्या कुटुंबियांना करायचे की नाही, याचा निर्णय फाशीनंतर कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पाहून घेण्यात येणार आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून तुरुंगाच्या आवारातच दफनविधीची तयारी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कारागृह नियमावलीनुसार फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यानंतर कैद्याच्या मृतदेहावर त्याच्या धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार करणे आवश्यक आहे. कैद्याच्या नातेवाइकांना स्वत: अंत्यसंस्कार करायचे असतील तर, त्यांना तसा अर्ज कारागृह अधीक्षकाला सादर करावा लागतो. परंतु, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्यता असेल तर कारागृह परिसरातदेखील अंत्यसंस्कार होऊ शकतात. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारागृह अधीक्षक यावर निर्णय घेणार आहेत.याकूबची घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटदु. ४.३० वाजात कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकूबची भेट घेतली. त्याला गुरुवारी सकाळी नाश्त्यात काय हवे, त्याची अखेरची इच्छा काय आहे याबाबत त्याला विचारणा केली. आपण केलेल्या कृत्याचा नेमका परिणाम काय होऊ शकतो हे याकूबला अगोदरपासूनच माहीत असल्याने त्याच्या मनाची तयारी झाली आहे.
याकूबचा दफनविधी होणार नागपुरातच ?
By admin | Published: July 30, 2015 1:30 AM