"जनतेच्या अस्मितेशी खेळू नका; नाही तर थेट राजकारणात या, आडून-आडून खेळण्यात मजा नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 05:20 PM2020-09-08T17:20:18+5:302020-09-08T17:27:08+5:30

हे ट्विट करताना यशोमती ठाकूर यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र त्यांच्या या ट्विटचा रोख अभिनेत्री कंगना राणौत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याकडेच असल्याचे बोलले जात आहे.

yashomati thakur comment on Film actors and News Anchors | "जनतेच्या अस्मितेशी खेळू नका; नाही तर थेट राजकारणात या, आडून-आडून खेळण्यात मजा नाही"

"जनतेच्या अस्मितेशी खेळू नका; नाही तर थेट राजकारणात या, आडून-आडून खेळण्यात मजा नाही"

Next
ठळक मुद्देहे ट्विट करताना यशोमती ठाकूर यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही.काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधानपरिषदेत कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आज विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला आहे.

मुंबई - महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेशी खेळू नका. राजकारण राजकारण्यांना करू द्या, नाही तर थेट राजकारणात या, आडून आडून खेळण्यात मजा नाही, असे आव्हान राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सिनेकलाकार आणि वृत्तवाहिन्यांच्या न्यूज अँकर्सना दिले आहे. 

यशोमती ठाकूर यांनी एक ट्विट करत हे आव्हान दिले आहे. ट्विटमध्ये ठाकूर म्हणाल्या, "काही सिनेकलाकार - न्यूज अँकर्स सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करत असतात. काही राजकीय अजेंडा असेल तर तो राबवा,पण म्हणून इथल्या जनतेच्या अस्मितांशी खेळू नका. जाता जाता - राजकारण हे राजकारण्यांना करू द्या, नाही तर तुम्ही थेट राजकीय प्रवाहात या. असं आडून आडून खेळण्यात काही मजा नाही!"

हे ट्विट करताना यशोमती ठाकूर यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र त्यांच्या या ट्विटचा रोख अभिनेत्री कंगना राणौत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याकडेच असल्याचे बोलले जात आहे.

कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव -
कंगनाने मुंबई ही पीओकेसारखी वाटते, मुंबई कोणाच्या बापाची नाही, मुंबई पोलिसांपेक्षा माफिया बरे अशी वक्तव्ये केली होती. यावरून महाराष्ट्रासह अभिनेते, नेत्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठविली होती. कंगनाच्या विरोधात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आघाडी उघडली होती. यावरून वेगवेगळे राजकीय रंग देण्याचे सुरु असताना आता काँग्रेसने कंगनाविरोधात हक्कभंग सादर केला आहे. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधानपरिषदेत कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. 

अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंग प्रस्ताव -
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आज विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर गोस्वामींनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत यांच्यावर त्यांनी सातत्यानं टीका केली असून त्यांचा उल्लेख अनेकदा एकेरी भाषेत केला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी गोस्वामींविरोधात हक्कभंग ठराव आणला आहे. हा प्रस्ताव पारित झाल्यास अर्णब यांच्यावर सभागृहाकडून कारवाई होऊ शकते.  

महत्त्वाच्या बातम्या -

महाराष्ट्र सरकार करणार कंगनाच्या ड्रग्स कनेक्शकनची चौकशी, अध्ययन सुमनची मुलाखत बनली आधार

कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट!

खूशखबर! : याच महिन्यात भारतात येतेय रशियन कोरोना लस, क्लिनिकल ट्रायलला होणार सुरुवात

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

आता संजय राऊत कंगनाला म्हणाले 'नॉटी' गर्ल, त्यांच्या भाषेत सांगितला 'हरामखोर'चा अर्थ

Web Title: yashomati thakur comment on Film actors and News Anchors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.