पिंपरी : वैष्णवी आंद्रे या विद्यार्थिनीने वयाच्या १६व्या वर्षी विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये ६९ पदके पटकावली आहेत. चार देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अलीकडेच वैष्णवीला महाराष्ट्र योग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.बिजलीनगर येथे राहणाऱ्या वैष्णवीचे शिशू वर्ग ते दहावी असे शालेय शिक्षण ज्ञान प्रबोधिनीत झाले. पाचवीत असताना तिची क्रीडाकुलमध्ये निवड झाली. या काळात शाळेकडून होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असताना एका स्पर्धेत योगशिक्षक चंद्रकांत पांगारे उपस्थित होते. वैष्णवीची योग्यता ओळखून योगासन प्रकारासाठी तिची निवड केली व तिथूनच तिचा हा क्रीडाप्रवास सुरू झाला.(प्रतिनिधी)योगा क्रीडाप्रकाराची माहिती नव्हती. परंतु, सततच्या सरावाने त्यात आवड निर्माण होत गेली. योगा विषयात पदवी संपादन करायची आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवायचे आहे. पांगारे सरांचे खूप मार्गदर्शन आहे. - वैष्णवी आंद्रेवैष्णवीने विविध प्रकारचे वॉर्मिंग अप सराव व एकूण १२२० प्रकारची सोपी, मध्यम, अवघड व अतिअवघड प्रकारच्या योगासनांचा अभ्यास पूर्ण केला आहे. तिने विविध ठिकाणी शिबिरात सहभाग घेऊन इतरांना प्रोत्साहन दिले आहे. तिने आंतराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेऊन देशाचे नाव मोठे केले आहे. आतापर्यंत ७४ शिबिरांमध्ये सहभागदररोजच्या सरावामध्ये वॉर्मिंग अप सराव, योगासन, सूर्यनमस्कार, सर्किट ट्रेनिंग, फिटर फिटनेस सराव, एरोबिक्स आदी प्रकारांचा समावेश होतो. आतापर्यंत साधारण ७४ रिदमिक व आर्टिस्टिक योग प्रात्यक्षिक, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या उद्घाटन, बक्षीस वितरण व इतर योग शिबिरांमध्ये सादरीकरण केले आहे. अनेक ठिकाणी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे. कॉमनवेल्थ यूथ गेम (२००८) व योगगुरू रामदेवबाबा यांच्या समोर ९ मिनिटांत ६९६ आसनांचे प्रात्यक्षिक सादर केले आहे. फ्रान्स, साऊथ कोरिया, थायलंड व बँकॉक या देशात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यंदाच्या वर्षी उत्कृष्ट योगपटू म्हणून ‘महाराष्ट्र योग भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. पॅरिस (फ्रान्स) येथे झालेल्या २५व्या वर्ल्ड योगा कपमध्ये योगा, अॅथलेटिक्स, आर्टिस्टिक, रिदमिक व डान्स योगा या पाच प्रकारांत सहभाग घेत चार पदके मिळवली. यात भारताला चॅम्पियनशिप मिळवण्यामध्ये वैष्णवीचा मोठा वाटा आहे.
वैष्णवीचा सहा वर्षांत ६९ पदकांचा योगाप्रवास
By admin | Published: June 21, 2016 12:17 AM