यवतमाळ : मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह असताना अनेक केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडणाºया कर्मचाऱ्यांचे मात्र हाल झाल्याचे चित्र पहायला मिळाले. अनेक केंद्रात पिण्यासाठी पाणीच नव्हेत. जेवणाचेही अबाळ झाले. काही केंद्रांमध्ये कर्मचाºयांना अन्नपाण्यशिवायभर उन्हातच बसून काम करावे लागले.
प्रत्येक मतदान केंद्रात मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राहील, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले असताना दुपारनंतर टळटळीत उन्ह असतानाही अनेक केंद्रांमध्ये मतदारांसाठी सोडा कर्मचाºयांसाठीही पिण्याचे पाणी नव्हेत. तहसील परिसरातील काटेबाई शाळेच्या मतदान केंद्रावर तर विचित्रच परिस्थिती होती. मतदान कर्मचारी म्हणून काम करणाºया यंत्रणेसाठी तेथे मंडप टाकण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांना उघड्यावर व झाडाच्या आडोशाने आश्रय घ्यावा लागला. त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी, नाश्ता, चहा, जेवण याची कोणतीही व्यवस्था नव्हती.
विशेष म्हणजे, परीक्षांचे पेपर तपासणाºया शिक्षकांचीही येथे ड्यूटी लावण्यात आली होती. अंजुमन इंग्लिश स्कूलच्या इमारतीत असलेल्या केंद्रावरील कर्मचाºया घरुन डब्यातून आणलेल्या नाश्तावरच दिवस काढावा लागला.असुविधेबाबत विजय दर्डा यांची खंतलोकमत मीडिया प्रा. लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा आणि संचालक देवेंद्र दर्डा हे मतदानासाठी काटेबाई शाळा केंद्रावर आल्यावर या गंभीर त्रुटींबद्दल त्यांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. अनेक कर्मचाºयांनीही त्यांची भेट घेऊन आपले मन मोकळे केले. यवतमाळातील तहसील कार्यालयानजीकच्या मतदान केंद्राची ही स्थिती असेल तर ग्रामीण भागातील मतदान केंद्रांची काय अवस्था असेल, याची कल्पनाच केलेली बरी असे विजय दर्डा म्हणाले.