शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

यंदा ४५ टक्के पाणीसाठा अधिक

By admin | Published: August 31, 2016 1:19 AM

पुणे जिल्ह्यातील २५ धरणांमध्ये आजअखेर ८६.८१ टक्के म्हणजेच १८६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी पावसाच्या दडीमुळे याच सुमारास हे प्रकल्प केवळ ४१ टक्के भरले होते.

पुणे : पुणे जिल्ह्यातील २५ धरणांमध्ये आजअखेर ८६.८१ टक्के म्हणजेच १८६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी पावसाच्या दडीमुळे याच सुमारास हे प्रकल्प केवळ ४१ टक्के भरले होते. त्या तुलनेत या पावसाळ्यात सर्व धरणांमध्ये मिळून ४५ टक्के पाणीसाठा अधिक आहे. पुणे जिल्ह्यात टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला हे धरण प्रकल्प मुठा खोऱ्यात, तर पवना, कासारसाई, मुळशी, कळमोडी, चासकमान, आंद्रा, भामा आसखेड, वडीवळे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर आणि वीर हे १२ प्रकल्प नीरा खोऱ्यात समाविष्ट आहेत. नाझरे, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे आणि घोड हे प्रकल्प कुकडी नदीच्या खोऱ्यात आहेत. विसापूर आणि उजनी हे प्रकल्प भीमा खोऱ्यात आहेत.या सर्व धरणांची साठवण क्षमता २१५.३१ अब्ज घनफूट (टीएमसी) असून, आजअखेर या धरणांमध्ये ५२९१.६८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच १८६.९२ टीएमसी (८६.८१ टक्के) पाणी आहे. २५ पैकी १३ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. सप्टेंबरमध्ये पावसाचे घटत जाणारे प्रमाण पाहता व उष्णतेचे वाढत जाणारे प्रमाण व पाणी वापर पाहता यापेक्षा अधिक साठा होण्याची शक्यता कमी आहे.सर्वाधिक पावसाच्या जून, जुलै, आॅगस्ट या महिन्यांमध्ये झालेल्या पावसाचे प्रमाण पाहता २०१३ मध्ये धरणांमध्ये सर्वाधिक ९७ टक्के पाणीसाठा असल्याचे दिसून येते. २०१२ पासूनच्या ४ वर्षांची तुलना केली असता : २०१५ व २०१२ या दोन वर्षांमध्ये आॅगस्टअखेरीस धरणांमधील पाणीसाठ्याची टक्केवारी चिंताजनकच होती. २०१२ मध्ये ५८.८८, २०१५ मध्ये ४१.०५ टक्के पाणीसाठा धरणांमध्ये होता. २०१४ मध्ये ८८.२१ टक्के पाणीसाठा होता.सर्वाधिक साठवण क्षमता (५३ टीएमसी) असलेल्या उजनी प्रकल्पात आजमितीस ६१ टक्के पाणीसाठा असून, दोन वर्षांनंतर या धरणात निम्म्यापेक्षा अधिक साठा असल्याने समाधानाचे वातावरण आहे.