शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

यंदा ‘कट आॅफ’ घसरला

By admin | Published: July 12, 2017 5:01 AM

गेल्या काही वर्षांच्या परंपरेनुसार, यंदाही अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीने नव्वदी पार केली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही वर्षांच्या परंपरेनुसार, यंदाही अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीने नव्वदी पार केली आहे. सोमवारी रात्री उशिराने जाहीर झालेल्या अकरावीच्या पहिल्या यादीत नामांकित महाविद्यालयांचा कटआॅफ हा नव्वद टक्क्यांच्या वर असल्याचे दिसून आले आहे. मात्र, यंदाचा कटआॅफ हा गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन ते तीन टक्क्यांनी घसरला. अकरावीच्या जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीत दीड लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यापैकी अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतिक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक विभागातर्फे जाहीर करण्यात आली आहे. अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार, सोमवारी सायंकाळी ५ वाजता पहिली यादी जाहीर होणार होती. पण नायसा कंपनीने दुपारपासून काम सुरू करूनही ते वेळेत पूर्ण केले नाही. डेटा अपलोड झाला नसल्याने शेवटी रात्री १ वाजता आॅनलाइन यादी जाहीर केली. ही यादी जाहीर झाल्यानंतर शिक्षण उपसंचालक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकरावी प्रवेशासाठी तब्बल २ लाख ३६ हजार १४३ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज सादर केले होते. यापैकी पहिल्या यादीत १ लाख ५६ हजार ५०७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. काही नामांकित महाविद्यालयांचा कटआॅफ ९४ टक्के इतका आहे. यंदा तिन्ही बोर्डाच्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाल्याने कटआॅफचा नवीन उच्चांक स्थापित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण तसे झाल्याचे दिसून आले नाही. अनेक विद्यार्थ्यांनी रुईया, झेविअर्स, एन.एम.सारख्या महाविद्यालयांना पसंती दिल्याचे दिसून आले आहे. एकीकडे पहिल्या यादीत प्रवेश मिळेल की नाही, अशी धाकधूक असणाऱ्या ७५ ते ८० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही पहिल्या यादीत क्रमांक लागला आहे. यंदा कोट्यातील जागांवर थेट झालेले प्रवेश, एसएससी निकालात ९० हून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांची कमी झालेली संख्या याचा परिणाम यादीवर झाला. >विद्यार्थ्यांनी रात्र जागून काढली : दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांचे १० जुलैला सायंकाळी जाहीर होणाऱ्या पहिल्या गुणवत्ता यादीकडे लागले होते. सोमवारी सायंकाळपासून विद्यार्थी आणि पालक यादीकडे डोळे लावून बसले होते. दुपारपासून कंपनीने डेटा अपलोड करण्याचे काम सुरू केले. पण डेटा अपलोड होत नव्हता. त्यामुळे अखेर रात्री साडेबारानंतर सर्व डेटा अपलोड करण्यात कंपनीला यश आल्यानंतर रात्री १ वाजता पहिली यादी जाहीर झाली. >५३ हजार जणांना मिळाली पहिली पसंतीपहिल्या पसंतिक्रमाचे महाविद्यालय मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५३ हजार ८०३ इतकी आहे. तर दुसरा पसंतिक्रम दिलेले महाविद्यालय २५ हजार ९५० विद्यार्थ्यांना मिळाले. तिसऱ्या पसंतिक्रमाचे महाविद्यालय १८ हजार २९२ आणि चौथ्या पसंतिक्रमाचे महाविद्यालय १४ हजार ३१२, तर पाचव्या क्रमांकाचे पसंतिक्रमाचे महाविद्यालय ११ हजार ८८७ विद्यार्थ्यांना मिळाले आहे.शाखानिहाय विद्यार्थीकला - १५,९१२विज्ञान - ४७,४२७वाणिज्य - ९२,०८३एमसीव्हीसी - १,०८५ (द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी)एकूण - १,५६,५०७कोटा प्रवेश व्यवस्थापन - १,५३१इनहाउस - ११,२९९अल्पसंख्याक - १९,५७४एमसीव्हीसी - ७३एकूण कोटा प्रवेश - ३२,४७७महाविद्यालयांमधील शाखानिहाय पहिली यादीकला महाविद्यालय कटआॅफसेंट झेवियर्स ९४ रामनिवास रुईया९०.६जय हिंद ८९.८वझे - केळकर ८३.८मिठीबाई ८३.८रूपारेल ८२.८विल्सन ७८.२बिर्ला ७७.६वाणिज्यमहाविद्यालय कटआॅफएच.आर. ९१.४जोशी-बेडेकर९०.४०वझे - केळकर ८९.६जय हिंद ८९.४केसी८८.८०एम. एल. डहाणूकर ८८.४रूपारेल ८७.५७साठे८६.२विज्ञानमहाविद्यालय कटआॅफरामनिवास रुईया९२.८०वझे- केळकर ९२.६बांदोडकर९२.४रुपारेल ९१.२ सेंट झेवियर्स ८९.८के.सी.८५.४०मिठीबाई ८५.१७जयहिंद ८४.६