नाशिक : गणेशोत्सव म्हटला की, मराठी माणसासाठी मंतरलेले १० दिवस... त्यात यंदा दशमीच्या वृद्धीमुळे बाप्पांचा मुक्काम बारा दिवस असल्याने उत्सवाचे रंग आणखी खुलणार आहेत.चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती गणरायाचे शुक्रवारी आगमन होतेय. घरोघरी बाप्पासाठी आकर्षक सजावटीची तयारी सुरू झाली आहे. यापूर्वी २००८, २००९ आणि २०१० मध्ये सलग तीन वर्षे बारा दिवस गणेशोत्सव साजरा झाला होता. आता पुन्हा तो योग जुळून आला आहे. अनंत चतुर्दशीला मंगळवार असला, तरी नेहमीप्रमाणे गणेश विसर्जन करता येणार असल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.शुक्रवारी सकाळी ८.२४ वाजल्यानंतर भद्रा असली, तरी श्रीगणेश स्थापना, प्राणप्रतिष्ठापना व पूजन करण्यास भद्रा वर्ज्य नाही. ब्रह्ममुहूर्तापासून पहाटे ४.३० ते ५ वाजल्यापासून मध्यान्ह काळापर्यंत (दुपारी १.४५ वाजता) सोईने कोणत्याही वेळी श्रीगणेश पूजन करता येईल.- मोहनराव दाते,पंचांगकर्ते, सोलापूर
यंदा दशमीच्या वृद्धीमुळे बाप्पांचा मुक्काम १२ दिवस, सात वर्षांनंतर जुळला योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 2:42 AM