औरंगाबाद : जलयुक्त शिवारची झालेली कामे आणि समाधानकारक पावसामुळे मराठवाड्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी रेल्वेने पाणी आणाव्या लागणाऱ्या लातुरात अद्याप एकही टँकर सुरू झालेला नाही.औरंगाबादकरांची भिस्त जायकवाडीवरच राहणार आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांत कमी पाऊस झाल्यामुळे टंचाईसदृश स्थिती आहे. १५१ गावांमध्ये १८६ टँकरने पाणीपुरवठा सध्या सुरू असून, १७९ विहिरी जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. जिल्ह्यात पावसाळा सुरू होईपर्यंत किमान ५०० टँकर लागण्याचा अंदाज आहे. जायकवाडीमध्ये ७५ टक्के पाणीसाठा आहे. १४ मध्यम प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. ६९ लघु प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्याने अनेक गावांत पाणी टंचाईची ओरड सुरू झाली आहे. नांदेड जिल्ह्यात टंचाईच्या झळांना प्रारंभ झाला आहे. १०६ प्रकल्पांमध्ये केवळ ३०़८४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जालन्यात १५ गावांना १८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. बीड जिल्ह्यातील सर्व प्रमुख प्रकल्पांमध्ये मार्चच्या दुसºया आठवड्यापर्यंत ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात २१९ प्रकल्पांत ३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ परभणीसह नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याची तहान भागविणाºया येलदरी प्रकल्पात केवळ ४़४१ टक्के पाणी उपलब्ध आहे़>लातुरात अद्याप एकाही टँकरचा प्रस्ताव नाहीलातूर जिल्ह्यात ८ मध्यम प्रकल्प असून त्यात सध्या ३८ टक्के जलसाठा आहे़ गेल्या वर्षी रेल्वेने पाणी आणाव्या लागणाºया जिल्ह्यात आतापर्यंत टँकरचा एकही प्रस्ताव नाही. आठ मध्यम प्रकल्पांत ३८.८ टक्के जलसाठा आहे.
मराठवाड्यात यंदा चांगला पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 4:51 AM