शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

महापौरांसाठी सव्वा वर्ष

By admin | Published: March 04, 2017 1:13 AM

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक १४ मार्चला होणार आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक १४ मार्चला होणार आहे. त्यामुळे महापौर, उमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष कोण होणार? याबाबत उत्सुकता आहे. अधिकाधिक सदस्यांना महापौर होता यावे, यासाठी भारतीय जनता पक्षाने सव्वा वर्ष हा फार्म्युला अवलंबिला आहे. त्यामुळे आता चार महापौर, चार उपमहापौर आणि चार स्थायी समिती अध्यक्ष होणार आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता होती. त्या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ठरवतील त्याच व्यक्तीला पद मिळत होते. तसेच गटातटांचाही समतोल सांभाळण्याचे काम केले जात होते. मात्र, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळालेले आहे. या वेळी महापौरपदाचे आरक्षण ओबीसी सर्वसाधारण असून, महापौर, उपमहापौरपदी वर्णी लागावी यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, आशा शेंडगे, जयश्री गावडे, आमदार महेश लांडगे यांचे समर्थक नितीन काळजे, संतोष लोंढे, राहुल जाधव, योगिता नागरगोजे, खासदार अमर साबळे यांचे समर्थक केशव घोळवे यांची नावे चर्चेत आहेत. शहरात जगताप, लांडगे, साबळे आणि आझम पानसरे असे गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे महापौर पिंपरी, चिंचवड की भोसरी विधानसभेचा होणार, कोणत्या गटाच्या उमेदवारास संधी मिळणार याबाबत चर्चा रंगू लागली आहे. महापालिकेत सत्ता आणण्यासाठी भाजपातील स्थानिक नेत्यांचे एकजूट झाली. मात्र, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती निवडीत कोणाच्या समर्थकांस स्थान द्यायचे, कोणाचा पहिला क्रमांक याबाबत चर्चा सुरू आहे. पाच वर्षांत एकच महापौर न देता सव्वा वर्ष प्रत्येकास दिल्यास शहरात चार महापौर होऊ शकतात. त्यामुळेच हाच फार्म्युला अवलंबिला जाणार असल्याचे भाजपातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)>कार्यकर्त्यांची मागणी : जुन्यांचा विचार व्हावानिवडणुकीपूर्वीच पक्षात आलेल्या उमेदवारांचा मुख्य पदांसाठी विचार करू नये, अशी मागणी जुन्या कार्यकर्त्यांनी केली आहे. शहरपातळीवरील नेत्यांच्या गटबाजीला स्थान देऊ नये, निवडून आलेल्या जुन्या कार्यकर्त्यांचा विचार केला जावा, संधिसाधूंना स्थान देऊ नये, अशी मागणी भाजपातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. महापौर निवडीनंतर स्थायी समिती, विधी, महिला बालकल्याण, क्रीडा व कला, शिक्षण मंडळ, वृक्ष प्राधिकरण अशा विविध समित्यांच्या सदस्य आणि अध्यक्षांची निवड होणार आहे. >निवडणूक कार्यक्रममहापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवड १४ मार्चला होणार आहे. ९ मार्चला महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. यंदा महापौरपद हे इतर मागासवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे या प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी एकाची महापौरपदी वर्णी लागणार आहे. महापौरपदासाठी ९ मार्चला दुपारी तीन ते पाच या वेळेत महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयात उमेदवारीअर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर १४ मार्चला सकाळी ११ वाजता महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई हे पीठासन अधिकारी असतील.