पंकज रोडेकर,
ठाणे- गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी यंदा महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागामार्फत सुमारे ८५० एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक३०० गाड्या बोरीवली डेपोतून सुटणार असून या बसगाड्यांचे आरक्षण महिनाऊर अगोदर घरबसल्या मोबाइल अॅपवरून करता येणार आहे. गुहागरला जाण्याकरिता आरक्षण करण्यासाठी सर्वाधिक गर्दी आहे. त्यालाच प्रवाशांची पहिली पसंती आहे.गणपती बाप्पांचे ५ सप्टेंबरला आगमन होत आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांकरिता एसटीकडून गतवर्षी दीडशे बसगाड्यांचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात, तरीसुद्धा ८५ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन यंदा ठाणे विभागातील ८ डेपोंमधून ८५० बस सोडण्याचे नियोजन केले आहे. याखेरीज, जादा बसफेऱ्या सोडण्याची शक्यताही विभागाने वर्तवली आहे. या ८ डेपोंतून ३१ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान या जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी जादा गाड्यांचे आरक्षण एक महिना अगोदर संगणकाद्वारे उपलब्ध करून दिले आहे. ४० दिवस अगोदर ग्रुपचे आरक्षण करता येणार आहे. त्यासाठी आगार व्यवस्थापकांकडे संपर्क साधावा लागणार आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी खाजगी एजंटमार्फतदेखील आरक्षण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर परतीच्या आरक्षणासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिली असून परतीचा प्रवास हा १० ते १५ सप्टेंबरदरम्यान असणार आहे. त्यामुळे सुरक्षित प्रवासाकरिता प्रवासाची तारीख निश्चित करून एसटी बसने प्रवास करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.।मोबाइल अॅपचाही वापरपरिवहन महामंडळाने अलीकडेच लांब व मध्यम लांब पल्ला तसेच लघु पल्ला मार्गावरील फेऱ्यांच्या आगाऊ आरक्षणासाठी मोबाइल अॅप उपलब्ध करून दिले आहे. टरफळउ टङ्मु’्रू फी२ी१५ं३्रङ्मल्ल अस्रस्र चा वापर करून वेळेची बचत होणार आहे. त्याचबरोबर तत्पर सेवा मिळणार आहे. हे अॅप रेल्वेच्या धर्तीवर असल्याने नागरिकांनी त्याचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.