पुणे : जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै व आॅगस्टमध्ये पावसाने दोन मोठ्या ‘इनिंग’ खेळून सर्वत्र पाणीच पाणी केले. आता तिसरी ‘इनिंग’ सुरू असून, आजअखेर एकूण ११८८६.१ मिमी व सरासरी ९१४.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आतापर्यंत झालेल्या पावसाने वार्षिक सरासरी पार केली आहे. ८३०.१ मिलिमीटर इतका पाऊस होतो. गेल्या वर्षी ४३ दिवसांत ६६६.४ मिमी म्हणजे ८०.३ टक्के इतका पाऊस झाला होता. या वर्षी चांगला पाऊस होणार, अशी शक्यता हवामान विभाग व तज्ज्ञांनी वर्तवली होती. मात्र, जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी चिंतेत होते. पण, जुलै महिना पाऊस घेऊन आला. पहिल्याच आठवड्यात त्याने जून व जुलै या दोन महिन्यचिंी सरासरी ओलांडली होती. त्यामुळे खरीप पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले. खरिपाच्या पेरण्याही चांगल्या झाल्या. जुलै महिन्याच्या १९ दिवसांत सरारसरी ३५० मिमी पाऊस पडला आहे. त्यानंतर आॅगस्टमध्ये पावसाची दुसरी इनिंग दमदार झाली. मात्र, त्यानंतर काही काळ पाऊस गायब झाला होता. विषेश म्हणजे, हा पाऊस जिल्ह्याच्या धरणक्षेत्रांत चांगला झाला. मात्र, पूर्व भागात दमदार पाऊस झाला नव्हता; त्यामुळे त्या परिसरात पुन्हा पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, गेल्या आठवडाभर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. ही इनिंग जर अशीच काही दिवस राहिली, तर या वर्षी सरासरी १००० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)>गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण ११,८८६.१ मिलिमीटर एवढा पाऊस झाला असून, तो सरासरी ९१४.३ मिलिमीटर आहे. >या वर्षी धरणक्षेत्रांत सध्या पाऊस सुरू असल्याने पाणीसाठा वाढण्यास मदत होत आहे. २५ पैैकी १३ धरणे १०० टक्के भरली आहेत. यात डिंभे, कळमोडी, चासकमान, वडीवळे, पवना, मुळशी, वरसगाव, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, नीरा-देवघर, भाटघर व वीर या धरणांचा समावेश आहे. तर, वडज ९८.५८, घोड ९६.११, भामा-आसखेड ९८.७३, वडीवळे ९९.४७, कासारसाई ९८.५७ ही पाच धरणे पाऊस सुरू राहिल्यास शंभरी गाठतील. नाझरे व येडगाव या दोन धरणांतच अत्यल्प साठा आहे. >पुणे, सोलापूर व नगर या जिल्ह्यांतील काही तालुक्यांना वरदायिनी समजले जाणारे उजनी धरण बुधवारी सकाळपर्र्यंत ६८.६७ टक्के भरले होते. गेल्या आठवडाभरात १० टक्के पाण्याची वाढ या धरणात झाली आहे. >उजनी धरणक्षेत्रात एकही मोठा पाऊस झालेला नसला, तरी पुणे शहर व परिसरातील धरणक्षेत्रांत पडलेल्या पावसामुळे उजनी धरणात पाणी आले आहे. धरणात २,८४४.७० दलघमी इतका साठा झाला असून, ३६.७९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.
यंदा जिल्ह्यात पावसाची विक्रमी इनिंग
By admin | Published: September 22, 2016 1:53 AM