पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.८९ टक्के, तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वांत कमी ८८.१८ टक्के लागला. गेल्या वर्षी ८५.८८ निकाल लागला होता. मात्र, यंदा निकालात ४.७८ टक्के वाढ झाली आहे.
राज्य मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची लेखी परीक्षा घेतली. परीक्षेसाठी १४ लाख २० हजार ५७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या १४ लाख १३ हजार ६८७ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ८१ हजार ७१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोरोनामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब झाला. परंतु, सर्व अडचणींवर मार्ग काढतात मंडळाने निकाल जाहीर केला.
निकालाची वैशिष्ट्ये मुलांपेक्षा मुलींची निकालाची टक्केवारी ५.८४ टक्क्यांनी अधिकदिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९३.५७ टक्केबोर्डातर्फे घेण्यात आलेल्या १५४ विषयांच्या परीक्षेपैकी २६ विषयांचा निकाल शंभर टक्केखासगीरित्या प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकाल ७२.०८ टक्के१६,७२० विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा लाभ ७५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण १,४३,४४१ विद्यार्थ्यांनी मिळविले.
शाखानिहाय २ वर्षांचा निकालशाखा २०१९ २०२०विज्ञान ९२.६० ९६.९३कला ७६.४५ ८२.६३वाणिज्य ८८.२८ ९१.२७व्यवसाय अभ्यासक्रम ७८.९३ ८६.०७
यंदा कोरोनामुळे उत्तरपत्रिका संकलनाचा मोठा प्रश्न होता. ‘रेड झोन’ असल्यामुळे शिक्षकांच्या घरून संकलन करावे लागले. त्यासाठी कर्मचाऱ्यांसोबत विभागीय मंडळाचे अध्यक्षव सचिव स्वत: फिरतहोते.- शकुंतला काळे, अध्यक्ष,राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण