शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

कल्याण पूर्वेत पिवळे पाणी

By admin | Published: April 27, 2016 3:59 AM

कल्याण पूर्वेत कायमच असलेल्या पाणीटंचाईत आता गढूळ-पिवळ््या रंगाच्या पाण्याची भर पडली आहे.

कल्याण : सध्या पाणीटचाई वगंभीर बनली असली तरी कल्याण पूर्वेत कायमच असलेल्या पाणीटंचाईत आता गढूळ-पिवळ््या रंगाच्या पाण्याची भर पडली आहे. तीन दिवस पाणीबंद आणि उरलेल्या चार दिवसांत कमी दाबाने पुरवठा, तोही पिवळ््या रंगाच्या पाण्याचा असी स्थिती असल्याने, काविळीसह पोटाच्या विकाराचे रूग्ण वाढत असल्याने सर्वत्र संताप खदखदत आहे. पूर्व भागातील विठ्ठलवाडी परिसरात कल्याण एण्डपाईंटला खडेगोळवलीजवळसाई चाळ आणि संगम चाळीत केवळ दोनच तास पाणीपुरवठा होतो. पाण्यासाठी या कॉलनीत महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. धरणात अपुरा पाणीसाठा असल्याचे सांगून पालिकेने आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. केवळ चार दिवस नळाला पाणी येते. तेही पुरेसे येत नाही. अनियमित-कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे केवळ दोन तास झुंबड उडते. नळाला येणारे पाणी पिवळे-दूषित असल्याने हे कसे पिणार? त्याचा इतर कामासाठीच वापर करावा लागतो. या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रार करुनही त्याची योग्यप्रकारे दखल घेतली जात नाही, अशी तक्रार साईबाबा चाळीत राहणाऱ्या श्रद्धा पेडणेकर यांनी केली आहे. तसेच संगम चाळीत राहणाऱ्या राजेश्वरी बेहरा यांनीही पाणीटंचाईचा मुद्दा मांडला आणि येणारे पाणी दूषित असल्याचे सांगितले. कल्याण पूर्वेतील ३२ क्रमांकाच्या प्रभागात राहणारे नागरिक दूषित पाण्याची तक्रार गेले महिनाभर पालिका प्रशासनाकडे करीत आहेत. हा प्रभाग उंच सखल आहे. अनेक जलवाहिन्या गटारातून गेल्या आहे. त्यांना अनेक टिकाणी गळती असल्यने, त्या गंजलेल्या असल्याने पुरवठा बंद असतो, त्यावेळी गटाराचे पाणी जलवाहिनीत शिरते. पण जलवाहिन्या दुरुस्त करण्याकडे महापालिकेचे लक्ष नाही. दूषित पाण्याविषयी शिवसेनेचे नगरसेवक नीलेश शिंदे यानी आवाज उठविला होता. प्रशासनाला नेमका कुठून दूषित पाणी पुरवठा होतो, याचा शोध घेता आलेला नाही याविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. विठ्ठलवाडी संगम कॉलनी आणि साईबाबा कॉलनीत ही स्थिती नाही. दुर्गामंदिर रोड, लक्ष्मीबाग, तीसगावनाका, कोळसेवाडी, विजयनगर, गणेशवाडी, शिवाजीनगर, रेल्वे कॉलनी परिसरातील नागरिकांनीही दूषित पाण्याविषयी तक्रारी केल्या आहेत.