शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचा मोठा निर्णय...! कर्करोगाच्या औषधांवरील GST घटवला; अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पातच केली होती घोषणा
2
Apple iPhone 16 Launch Event : डेडिकेटेड कॅमेरा बटण, Apple Intelligence आणि बरंच काही; iPhone 16 लॉन्च, किती आहे किंमत?
3
Apple iPhone 16 Launch Event : ३० मिनिटांत ८० टक्के चार्जिंग, आजवरचा मोठा डिस्प्ले; Apple Watch Series 10 लॉन्च
4
चोपड्यातील जवानाला त्रिपुरा येथे दहशतवाद्यांचा सामना करताना हौतात्म्य
5
बोलताना आवाज आपोआप होणार कमी, कानाच्या आरोग्याचीही काळजी घेणार; ॲपलचे नवीन Airpods झाले लाँच
6
कुणी रचला कानपुरात कालिंदी एक्सप्रेस उडवण्याचा कट? आयएसच्या खोरासान मॉड्यूलवर संशय
7
मोठा खेला होणार...? काँग्रेस-JMM चे एवढे आमदार भाजपच्या संपर्कात, हिमंता बिस्वा सरमा यांचा मोठा दावा
8
"काहींनी फडणवीसांचा गैरफायदा घेतला"; हसन मुश्रीफ यांची समरजित घाटगेंवर नाव न घेता टीका
9
देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला, केंद्र सरकारनं अधिकृतपणे दिली माहिती
10
भारत पाकिस्तानशी चर्चेसाठी तयार! संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची ही अट शाहबाज सरकारला पूर्ण करावी लागणार
11
एकीकडे मैत्री, दुसरीकडे विश्वासघात...! चीनचा पुतिन यांना बडा झटका
12
"शरद पवारांना देव आठवले", लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर भाजपने घेरले
13
'नागपुरातील अपघातातील 'ती' कार चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाची', सुषमा अंधारेंचा आरोप, बावनकुळेंनीही दिले प्रत्युत्तर
14
Pathum Nissanka, ENG vs SL 3rd Test: १० वर्षांचा दुष्काळ संपला! पाथूम निसांकाचे तुफानी शतक; श्रीलंकेचा इंग्लंडवर दमदार विजय
15
'या' IPO ने मिळवून दिला जबरदस्त नफा! 5 दिवसात कमावले दुप्पट पैसे
16
एअरटेल वापरकर्त्यांसाठी Amazon प्राइम सबस्क्रिप्शन मोफत; Airtel या प्लॅनने रिचार्ज करा
17
VIDEO: धडामssss.... कॉमेंट्री बॉक्समध्ये नासिर हुसेन खुर्चीवरून पडला, नक्की काय घडलं?
18
पवारांच्या मनातील मला कळते, पण शाह यांना फडणवीसांच्या मनातील कळत नाहीय; जयंत पाटलांचा दावा
19
मुंबईच्या झोपडपट्टीत राहिले, खर्च भागवण्यासाठी पुस्तके अन् राख्या विकल्या; आज दुबईतील श्रीमंतांच्या यादीत

राज्यात ‘येरवडा’ पॅटर्न! सीआयडीसाठी राष्ट्रवादी सहमत नाही, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा निरोप; मीरा बोरवणकरांचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 6:50 AM

येरवड्यातील जमीन ज्या बिल्डरला ‘प्रक्रिये’नुसार देण्यात आली होती. त्याच्या आजूबाजूचे दोन्ही भूखंड संबंधित बिल्डरचेच होते, असा दावा त्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्रात शासनाच्या भूखंडांवर नजर असलेल्या बिल्डर्सचे राजकीय नेते, नोकरशहा आणि पोलिसांशी भयंकर लागेबांधे असून पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्याच्या जमिनीचा लिलाव हे एकमेव उदाहरण नाही, असा आरोप सोमवारी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी येथे केला.

येरवड्यातील जमीन ज्या बिल्डरला ‘प्रक्रिये’नुसार देण्यात आली होती. त्याच्या आजूबाजूचे दोन्ही भूखंड संबंधित बिल्डरचेच होते, असा दावा त्यांनी केला. राज्यात अनेक ठिकाणी ‘येरवडा’ पॅटर्नने सरकारी भूखंड हडपण्याचे प्रकार सुरू आहेत. पुस्तकातील खुलाशानंतर अनेक अधिकारी, माजी न्यायमूर्तींचे मोठ्या प्रमाणावर फोन येत आहेत. कोर्टामुळे औरंगाबादमधील ५० एकरचा भूखंड बिल्डरच्या घशात जाण्यापासून वाचला, असे त्या म्हणाल्या.

इतर ठिकाणची जमीनही हडपली?पुण्यातील वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूटची जागा एका बिल्डरला हस्तांतरित करण्यासाठी २०१३ ते २०१६ या काळात आपल्यावर केंद्रीय संस्थांचा दबाव आणला होता, असा संदेश एका अधिकाऱ्याने पाठविला. आता पुण्यातील राज्य राखीव पोलिस दलाची (एसआरपीएफ) पण जमीन गेली आहे, त्याबद्दलही बोला, असा एका अधिकाऱ्याचा फोन आपल्याला आला, असे मीरा बोरवणकर म्हणाल्या.

आपला राजकारणाशी संबंध नाही. त्यामुळे या खुलाशामुळे पुढे काय होईल हे सांगू शकत नाही. जिथे जिथे खासगी बिल्डर्सना सरकारी जमिनी दिल्या आहेत, त्यांचा फेरआढावा घेण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.

सीआयडीचे पद मिळाले नाहीयेरवडा पोलिस ठाण्याची जमीन देण्यास ठाम नकार देण्याचा परिणाम आपल्याला पुढच्या नियुक्तीवर झाला. पुण्यात अपर महासंचालक सीआयडीचे पद रिक्त असतानाही आपल्याला ते नाकारण्यात आले. सीआयडीमध्ये बिल्डरांशी संबंधित अनेक प्रकरणांची चौकशी प्रलंबित होती. या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सहमत नसून आघाडीचा धर्म पाळावा लागेल, असे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी  सांगितले, पण पुण्यातच नियुक्ती हवी असल्यामुळे कारागृह विभागातील नियुक्ती स्वीकारली, असे बोरवणकर म्हणाल्या.

‘मॅडम, आपण यात पडू नका’आपण तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेतली. तेव्हा ‘मॅडम आपण यात पडू नका,’ असे त्यांनी आपल्याला बजावले होते. ज्यांच्या कार्यकाळात जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली होती ते आपल्या आधीचे पोलिस आयुक्तही खुश नव्हते. 

अब्रूनुकसानीचा दावा त्यांची इच्छा‘दादा’ अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे निदर्शनास आणले असता, ‘त्यांची इच्छा’ अशी प्रतिक्रिया बोरवणकर यांनी दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPoliceपोलिसNCPराष्ट्रवादी काँग्रेस