हो! २०१४, १७, १९ मध्ये BJP शी चर्चा झाली होती, दादांच्या दाव्यावर अखेर पवार बोलले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 12:09 PM2023-07-08T12:09:49+5:302023-07-08T12:17:07+5:30

Sharad Pawar Vs Ajit Pawar: खुद्द शरद पवार यांच्या पुढाकारानेच भाजपासोबत सत्तास्थापनेसाठी २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये चर्चा झाली होती, असा दावा अजित पवार यांनी केला होता.

Yes, there was discussion with BJP in 2014, 17 and 19, Sharad Pawar accepted Ajit Pawar's claim, said... | हो! २०१४, १७, १९ मध्ये BJP शी चर्चा झाली होती, दादांच्या दाव्यावर अखेर पवार बोलले, म्हणाले...

हो! २०१४, १७, १९ मध्ये BJP शी चर्चा झाली होती, दादांच्या दाव्यावर अखेर पवार बोलले, म्हणाले...

googlenewsNext

या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी होऊन शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे आमने-सामने आले आहेत. त्यातच अजित पवार यांनी थेट राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ ह्या चिन्हावर दावा ठोकल्याने शरद पवारांसमोरील आव्हान वाढले आहे. दरम्यान, बुधवारी मुंबईत शक्तिप्रदर्शन करताना अजित पवार यांनी शरद पवारांचं नाव न घेता अनेक गौप्यस्फोट केले होते. तसेच खुद्द शरद पवार यांच्या पुढाकारानेच भाजपासोबत सत्तास्थापनेसाठी २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये चर्चा झाली होती, असा दावा केला होता. अजित पवार यांनी केलेल्या या दाव्यावर शरद पवार यांनी मान्य केला आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपासोबत चर्चा झाली होती. मात्र विचारसरणी वेगळी असल्याने ही चर्चा पुढे सरकू शकली नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी सांगितले की, आम्ही २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये भाजपासोबत चर्चा केली होती. मात्र आपली विचारसरणी वेगळी असल्याने आपण असं करता कामा नये, असं मी ठरवलं. प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये ही गोष्ट समजण्याचं गांभीर्य नाही, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

दरम्यान, राज्यात सध्या स्थिर सरकार तर आहे. मात्र हे सरकार दिल्लीतीली भाजपाकडून चालवलं जाणार आहे. तसेच येथे इतर लोकांना केवळ मंत्रिपद मिळेल, असा चिमटा शरद पवारांनी काढला. ते पुढे म्हणाले की, कुटुंबात जे काही झालं त्याची चर्चा मी बाहेर करणार नाही. मला नक्कीच वाईट वाटलं. हे सारे जण माझे जवळचे होते. मात्र मी आधीही अशा घटनांचा सामना केला आहे. मी पक्षाला पुन्हा उभं करेन. निवडणूक आयोगामध्ये काय होईल. त्याने फरक पडत नाही. मी जमीनीवर काम करेन, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

मी वयाच्या ८२ व्या वर्षीही काम करू शकतो. मी अजून म्हातारा झालेलो नाही. मी ना टायर्ड झालोय, ना रिटायर्ड झालोय, अशा शब्दात निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या अजित पवार यांना शरद पवार यांनी टोला लगावला आहे.  

Web Title: Yes, there was discussion with BJP in 2014, 17 and 19, Sharad Pawar accepted Ajit Pawar's claim, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.