ऑनलाइन लोमकतनवी दिल्ली, दि. ६ : शालेय अभ्यासक्रमात योगाला भाग बनविण्याचा आदेश केंद्राने राज्य सरकारांना दिला असल्याचे आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लोकसभेत सांगितले. हा अनिवार्य नव्हे तर ऐच्छिक विषय राहणार असून मानव संसाधन विकास मंत्रालयाने त्याबाबत राज्यांना पत्र पाठविले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना हा विषय घेता येईल, असे त्यांनी एका उत्तरात नमूद केले.येत्या शैक्षणिक वर्षापासून योग हा शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनेल, अशी आम्हाला आशा आहे. पोलिसांना योग अनिवार्य करण्यात आला असून संरक्षण मंत्रालयातील जवानांसाठीही तो बंधनकारक करण्याची योजना आहे. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात केंद्र सरकारला यश मिळाले आहे. २१ जून २०१५ रोजी १९२ देशांमध्ये हा दिवस साजरा करण्यात आला, अशी माहितीही त्यांनी दिली.
शालेय अभ्यासक्रमात ‘योगा’चा समावेश होणार
By admin | Published: May 06, 2016 8:05 PM